जेव्हा जेव्हा अभिनेत्री रेखाचा विचार येतो तेव्हा तिच्याशी जुळलेल्या रहस्याबाबत चर्चा होते. रेखा तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जेवढी चर्चेत असते तितकी चर्चा तिच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल फारशी झाली नाही. मग ते अमिताभ बच्चनबरोबरचे तिचे अफेअर असो किंवा उद्योगपती मुकेश अग्रवालबरोबरचे तिचे लग्न आणि त्यानंतर त्यांनी केलेली आत्महत्या असो. पतीच्या आत्महत्येनंतर रेखाला ‘व्हॅम्प’ व ‘विच’ असे टॅग देण्यात आले होते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी रेखावर आपला राग व्यक्त केला होता. पण सत्यात काय चाललं होतं माहीत आहे का? पती मुकेश अग्रवाल यांच्या आत्महत्येनंतर अभिनेत्रीला कशाचा सामना करावा लागला?, हे फार कमी जणांना ठाऊक असेल. (Actress Rekha On Her Marriage Life)
रेखा यांनी १९९० मध्ये व्यापारी मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले, पण लग्नाच्या अवघ्या सात महिन्यांनंतर त्यांनी आत्महत्या केली. रेखा यांनी एकदा सिमी ग्रेवालच्या शोमध्ये लग्न व पतीच्या मृत्यूबद्दल भाष्य केले होते. यावेळी त्यांनी सांगितले होते की, “हे एक अरेंज मॅरेज होते, ज्यामध्ये त्यांच्यात प्रेम नव्हते. उलट ती एक सामाजिक व्यवस्था होती”.
आणखी वाचा – ग्रँड फिनाले आधीच ‘खतरों के खिलाडी १४’ चा विजेता घोषित, ‘या’ स्पर्धकाने पटकावली ट्रॉफी, फोटो-व्हिडीओ व्हायरल
रेखाने सांगितले होते की, “मुकेश अग्रवालशी लग्न करण्यापूर्वी ती फक्त एकदा त्याला भेटली होती. रेखाच्या मते, मुकेशबरोबर लग्न करणे धोक्याचे होते. पण नशिबाचा विचार करुन तिने हा धोका स्वीकारला”. रेखा म्हणाली होती की, मुकेशचा मृत्यू तिच्यासाठी खूप कठीण होता. पतीच्या मृत्यूनंतर तिला मोठा धक्का बसला. मुकेश आता या जगात नाहीत हे रेखाला आधी मान्यच नव्हते. तिने त्याचा मृत्यू स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर तिला आत्मभान होऊ लागले आणि विचार करु लागली की हे फक्त माझ्याच बाबतीत का होत आहे?”.
आणखी वाचा – नव्या घरात रुपाली भोसलेने बनवला ‘हा’ पहिला पदार्थ, स्वयंपाकघरही आहे इतकं सुंदर, व्हिडीओ समोर
रेखा म्हणाली होती, “मला प्रश्न पडतो की हे फक्त माझ्याबरोबरच का झालं? मी कधीच चूक केली नाही. माझ्यामुळे कोणाला दुखापतही झाली नाही. मी कधीच कोणाला दुखवले नाही. फक्त मी समजून घेण्याचा प्रयत्न करत राहिले, पण कोणीच मला समजून घेतले नाही”. पतीच्या मृत्यूच्या धक्क्यातून ती कशी सावरली, तिने सर्व काही कसे सहन केले, असे विचारले असता रेखा म्हणाली, ‘याचा कोणीही व्यवहार करत नाही, तर तुमच्याशीच व्यवहार करतो. परंतु जर तुम्ही या संपूर्ण घटनेचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होऊ दिला तर तसे व्हा.