Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व विशेष गाजताना दिसत आहे. यंदाच्या पर्वाचे अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदाचं हे ‘बिग बॉस’चं पर्व १०० दिवसांऐवजी ७० दिवसांत संपणार असल्याचं समोर आलं आहे. तेव्हापासून ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. यंदाच्या या ‘बिग बॉस’च्या पर्वात गायक अभिजीत सावंतचा प्रवास पाहणं रंजक ठरत आहे. अगदी पहिल्या दिवसापासून अभिजीतने स्वतःच असं स्थान निर्माण करत प्रेक्षकांची मन जिंकली. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत अभिजीत उत्तम खेळ खेळताना दिसत आहे.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अभिजीत रडताना दिसला. कारण अभिजीतला ‘बिग बॉस’च्या घरात खूप मोठं सरप्राइज मिळालेलं पाहायला मिळालं. ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांच्या कुटुंबियांची एण्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात समोर आलेल्या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ सर्व सदस्यांना फ्रिज होण्याचे आदेश देतात. आणि घराचा दरवाजा उघडतो आणि अभिजीतची पत्नी घरात एंट्री करते. बायकोला पाहून अभिजीत ढसाढसा रडू लागतो. त्यानंतर ती अभिजीतला धीर देताना दिसते.

इतकंच नव्हे तर बायकोच्या पाठोपाठ अभिजीतच्या दोन्ही मुली येतात. धावत धावत त्या अभिजीतकडे येतात दोन्ही मुलींना दोन महिन्यांनी समोर पाहून अभिजीत ढसाढसा रडतो, तर त्याच्या दोन्ही मुलीही बाबाला समोर मिठी मारुन रडू लागतात. यावेळी घरातील इतर स्पर्धकांचेही डोळे पाणवतात. अभिजीत व त्याच्या कुटुंबीयांच्या भेटीचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नवऱ्याला भेटल्यानंतर घराबाहेर आल्यावर शिल्पाने खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सूरज मालक झाल्यानंतर जान्हवी-अंकिताला करायला लावली लावणी, गाणंही स्वतःच्याच आवडीचं अन्…
पोस्ट शेअर करत शिल्पाने असं म्हटलं आहे की, “सर्वात आधी आम्हाला ‘बिग बॉस मराठी’मध्ये बोलावल्याबद्दल कलर्स मराठी वाहिनीचे आणि संपूर्ण टीमचे खूप खूप आभार. इतक्या दिवसांनंतर अभिजीतला बघून खूपच छान वाटलं. आम्हाला भेटल्यावर तो आता अजून उत्तम गेम खेळेल हे नक्की. तो खूप जास्त स्ट्राँग माणूस आहे. आजचा फॅमिली स्पेशल एपिसोड बघायला विसरु नका आणि आपल्या अभिजीतला भरभरुन वोट करा”.