सध्या टेलिव्हिजनपेक्षा ओटीटीला प्रेक्षकांची अधिक पसंती मिळताना पाहायला मिळते. ओटीटीवर विविध विषय अतिशय सुंदररित्या हाताळतात आणि ही वेगळी धाटणी प्रेक्षकांनादेखील ओटीटीकडे आकर्षित करते. कौटुंबिक, रोमॅंटिक, हॉरर अशा धाटणीचे अनेक चित्रपट व वेबसीरिज ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अशातच या आठवड्यातही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे? या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला कोणत्या सीरिज व चित्रपट येणार आहेत, जाणून घ्या… (OTT Series News)
ताजा खबर २ : ‘ताझा खबर’ वास्याच्या (भुवन बाम) कथेचे अनुसरण करते, जो एक स्वच्छता कर्मचारी आहे आणि त्याच्याकडे भविष्य पाहण्याची शक्ती आहे. या शक्तीमुळे त्याचे दिवस पालटतात. ‘ताजा खबर २’ सीरिजची कथा वसंत गावडे उर्फ वास्याची आहे आणि भुवन बाम त्याच व्यक्तिरेखा साकारत आहे. वसंतला अचानक जादूची शक्ती प्राप्त होते. २७ सप्टेंबरपासून Hotstar या ओटीटी माध्यमावर ही सीरिज पाहता येणार आहे. यामध्ये भुवन बाम, श्रिया पिळगावकर, जावेद जाफेरी, महेश मांजरेकर, देवेन भोजानी, प्रथमेश परब, नित्या माथूर आदी कलाकार आहेत.
आणखी वाचा – “माझ्या आयुष्यातील…” कार्तिकी गायकवाडची नवऱ्यासाठी रोमॅंटिक पोस्ट, फोटोने वेधलं लक्ष
लव्ह सितारा : नागार्जुनची भावी सून आणि नागा चैतन्यची होणारी पत्नी, अभिनेत्री शोभिता धुलिपालाचा ‘लव्ह सितारा’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, बी जयश्री, संजय भुतियानी, तमारा डिसूझा, रिजुल रे आणि व्हर्जिनिया रॉड्रिग्ज यांच्या भूमिका आहेत. तुम्ही ते झी-५ वर २७ सप्टेंबर २०२४ रोजी पाहू शकाल.
हनिमून फोटोग्राफर : अर्जुन श्रीवास्तवच्या या सीरिजची कथा एका व्यावसायिक छायाचित्रकारावर केंद्रित आहे, जो एक असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी मालदीवमध्ये जातो. पण कथेला ट्विस्ट येतो जेव्हा तिच्या क्लायंट वराचा मृत्यू होतो. या मालिकेत आशा नेगी, राजीव सिद्धार्थ, अपेक्षा पोरवाल आणि साहिल सलाथिया मुख्य भूमिकेत आहेत. ‘हनिमून फोटोग्राफर’मध्ये साहिल सलाथिया, अपेक्षा पोरवाल आणि संदेसा स्वल्का हे कलाकार आहेत. ही सीरिज २७ सप्टेंबर रोजी जिओ सिनेमा या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे.
द ग्रेट इंडिया कपिल शो : नेटफ्लिक्सवर ‘द ग्रेट इंडिया कपिल शो’चा दुसरा सीझन सुरू झाला आहे. या शोचा पहिला एपिसोड प्रसारित झाला आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट ‘जिगरा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. दुसरा एपिसोड २८ सप्टेंबरला येणार आहे. ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर, सैफ अली खान दुसऱ्या एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत. हे स्टार्स त्यांच्या देवरा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येत आहेत. देवरा: पार्ट १ २७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.