Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ या रिऍलिटी शोने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. वादग्रस्त शोपैकी एक असणाऱ्या या रिऍलिटी शोने साऱ्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. यंदाच्या बिग बॉसच्या पाचव्या पर्वाची विशेष चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. २८ जुलैला या पर्वाचा ग्रँड प्रीमियर अगदी दणक्यात पार पडला आणि तब्बल १६ सदस्यांनी ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश केला होता. तर एका वाईल्ड कार्ड स्पर्धकानेही घरात एंट्री केली. सध्या घरात ८ सदस्य उरले आहेत. आणि या ८ सदस्यांपैकी कोणता स्पर्धक ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.
काही दिवसांतच ‘बिग बॉस’प्रेक्षकांचा निरोप घेणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. आता त्यानंतर ‘बिग बॉस’ने केलेल्या घोषणेने साऱ्यांना खूप मोठा धक्का दिला आहे. अखेर ‘बिग बॉस’ने यासंदर्भात अधिकृतरित्या घोषणा केली आहे. सर्व स्पर्धकांना लिव्हिंग एरियामध्ये बोलावत ‘बिग बॉस’ने सदस्यांना खूप मोठा धक्का दिला. यंदाचा सीझन हा १०० दिवसाचा नसणार असल्याचं सांगत साऱ्यांना धक्का दिला. ते ऐकून स्पर्धकांसह आता प्रेक्षकांनाही काय सुरु आहे याची उत्सुकता लागून राहिली.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्की व अभिजीतमध्ये जोरदार भांडण, दोघांनीही मैत्री तोडली, पण नेमकं झालं तरी काय?
यावेळी ‘बिग बॉस म्हणाले, “यंदाचा सीझन ब्लॉकबस्टर ठरला आहे. टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा या सीझनने बाजी मारली आहे. क्रिकेटमध्ये आधी टेस्ट मॅच व्हायच्या. कालांतराने एकदिवसीय सामने तर आता सर्वत्र टी-२० ची क्रेझ निर्माण झाली आहे. अगदी याचप्रमाणे या सीझनबाबत ‘बिग बॉस’ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा सीझन १०० दिवसांचा नसेल. शंभर दिवसांऐवजी हा सीझन फक्त १० आठवड्यांचा म्हणजेच एकूण ७० दिवसांचा असेल”. यंदा ‘बिग बॉस’ने कोणताही नॉमिनेशन टास्क न घेता सगळ्या आठ सदस्यांना थेट नॉमिनेट केलं आहे. आता महाअंतिम सोहळा जवळ आल्याने सगळ्या सदस्यांना नॉमिनेट करण्याचा निर्णय ‘बिग बॉस’कडून घेण्यात आला आहे
बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले म्हणजेच महाअंतिम सोहळा येत्या ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. ६ ऑक्टोबरला यंदाच्या पर्वात कोणता स्पर्धक बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आजच्या दिवसापासून ग्रँड फिनालेला केवळ १४ दिवस शिल्लक असल्याचंही ‘बिग बॉस’ने सर्व सदस्यांना सांगितलं.