Laapataa Ladies Oskar Selection : ‘लापता लेडीज’ हा चित्रपट १ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. किरण रावच्या चित्रपटाचं समीक्षक आणि प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं होतं. महिला सक्षमीकरणावर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप भावला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांना क्षणभर हसवलं तर रडवलंही. नुकतेच लग्न झालेले दोन जोडपे एका ट्रेनमध्ये चढतात. दोन्ही नववधूंच्या चेहऱ्यावर मोठे बुरखे आहेत. ते दोघे ट्रेनमधून उतरण्याच्या घाईत कसे बेपत्ता होतात आणि पुढे काय होते? याची गोष्ट ‘लापता लेडीज’ या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. कथानक उत्तम असेल तर ती कलाकृती उत्तम होते हे ‘लापता लेडीज’ने सिद्ध करुन दाखवलं. (97 Oskar Awards Laapataa Ladies Selection)
प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याबरोबरच त्यांच्या ज्ञानात भर घालण्याचं काम ‘लापता लेडीज’ने केलं. ‘लापता लेडीज’ या चित्रपटात तीन नवोदित कलाकार आहेत. मात्र या नवीन कलाकारांना पाहून ते नवोदित कलाकार आहेत असं कुठेही वाटत नाही. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसनंतर ओटीटीवरही चांगली कमाई केली. अशातच आता याबद्दल आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे हा चित्रपट ‘ऑस्कर २०२५’साठी निवडला गेला आहे आणि या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा श्रेणीसाठी निवड झाली आहे.
आणखी वाचा – आधी वडील नंतर भावाचं झालं होतं निधन, अपूर्वा नेमळेकर एकटीच पडली, म्हणाली, “थोडा वेळ रडून…”
भारतीय चित्रपटाला सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचा ऑस्कर मिळावा यासाठी दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा आता संपणार आहे. चेन्नई येथील एका कार्यक्रमात, ९७ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीसाठी अधिकृत प्रवेश निवडण्यासाठी जबाबदार असलेली सर्वोच्च संस्था, ‘द फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’च्या सदस्यांनी ‘लापता लेडीज’ या चित्रपटाला अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून घोषित केले आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : बाई गंऽऽ करमत नाही गंऽऽ! अरबाज गेल्यानंतर निक्कीची वाईट अवस्था, रडून हाल अन्…
किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा चित्रपट बिप्लब गोस्वामी यांच्या कादंबरीवर आधारित आहे. यात रवी किशन, स्पर्श श्रीवास्तव, प्रतिभा रांता, नितांशी गोयल व मराठी अभिनेत्री छाया कदम यांच्या भूमिका आहेत. ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली आहे. दरम्यान, याआधी ऑस्करच्या अंतिममध्ये स्थान मिळविणारा आमिर खान व आशुतोष गोवारीकर यांचा यांचा ‘लगान’ (2001) हा चित्रपट होता. जो ‘नो मॅन्स लँड’कडून पराभूत झाला.