शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आधी वडील नंतर भावाचं झालं होतं निधन, अपूर्वा नेमळेकर एकटीच पडली, म्हणाली, “थोडा वेळ रडून…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 23, 2024 | 11:59 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Apurva Nemlekar Father and Brother Emotional Post

अपूर्वा नेमळेकरची वडील व भाऊसाठी भावुक पोस्ट

‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाने ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारली होती. तिने साकारलं हे पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं. या लोकप्रिय मालिकेनंतर अपूर्वा स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे, या मालिकेत अभिनेत्री सावनी हे पात्र साकारत आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी अपूर्वा सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर आपल्या खाजगी आयुष्याबद्दलच्याही अनेक गोष्टी शेअर करते. (Apurva Nemlekar Emotional Post)

अपूर्वा ‘बिग बॉस मराठी’ सीजन ४ मध्ये स्पर्धक म्हणून दिसलेली. या सीझनची ती उपविजेती ठरली. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यावरच काही महिन्यांनी तिच्या भावाचे दुःखद निधन झाले. त्यामुळे ती खूपच एकटी पडलेली. अनेकदा सोशल मीडियावर ती आपल्या भावाच्या आठवणी शेअर करायची. तसंच ‘बिग बॉस’च्या घरात असताना अपूर्वाने वडील गेल्यानंतरच्या काही भावुक आठवणीसुद्धा शेअर केल्या होत्या. अशातच तिने पुन्हा एकदा वडील आणि भावाच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर केली आहे. अपूर्वाने स्वत: धीर देणारी एक पोस्ट लिहिली आहे. अपूर्वाने इन्स्टाग्रामवर वडील व भाऊबरोबरचे फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

आणखी वाचा – महाराष्ट्राचे ‘भूषण’ आता छोटा पडदा गाजवणार! अशोक सराफ यांची नवीन मालिका, भूमिका आहे फारच खास

या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “प्रिय मी स्वत, मला माहित आहे की आज हे माझ्यासाठी सोपे नव्हते. पण कृपया मला कसे वाटते हे मला सांगू नका, जोपर्यंत मी हे मान्य करत नाही की, पप्पा आणि भाई आता आमच्यात नाहीत, माझे तुटलेले हृदय बरे होईल असे सांगू नका. कारण ते खरे नाही, कृपया मला सांगू नका की, माझे पप्पा आणि भाई चांगल्या ठिकाणी आहेत.  हे खरे असले तरी मला ते इथे माझ्याबरोबर हवे आहेत. मला सांग ना मला कधीतरी त्यांचा आवाज ऐकू येईल आणि त्यांचे चेहरे दिसतील. आजच्या पलीकडे मी पाहू शकत नाही, मला सांगू नका की, पुढे जाण्याची वेळ आली आहे, कारण मी करू शकत नाही, ते गेले या वस्तुस्थितीचा सामना करण्यास मला सांगू नका, कारण ही अशी गोष्ट आहे जी मी थांबवू शकत नाही”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi घेणार एक मोठा निर्णय, महत्त्वाची घोषणा करताच सदस्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडणार, नेमकं काय झालं?

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “मी त्यांच्याबरोबर मिळालेल्या वेळेबद्दल आभार मानायला हवेत, कारण मला तो आणखी हवा होता. मला सांगू नका की, मी पूर्वीसारखी कधीच राहणार नाही. तू मला काय सांगू शकतोस तू माझ्यासाठी इथे असशील, जेव्हा मी पप्पा आणि भाईबद्दल बोलेन तेव्हा तुम्ही ऐकाल. माझ्या अनमोल आठवणी तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता. तुम्ही माझ्याबरोबर थोडावेळ रडू देखील शकता आणि कृपया त्यांचे नाव घेण्यास अजिबात संकोच करू नका, कारण ते मला दररोज ऐकण्याची खूप इच्छा आहे. माझ्या प्रिय स्वत: ला कृपया लक्षात घे की मी कधीही सारखी असू शकत नाही, परंतु जर तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात तर, मी एखाद्या दिवशी बनलेली नवीन व्यक्ती तुम्हाला आवडेल”.

Tags: apurva nemlekarApurva Nemlekar Father and Brother Emotional Postmarathi actress
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 After Arbaz Patel exit from house Nikki Tamboli is completely alone

Bigg Boss Marathi : बाई गंऽऽ करमत नाही गंऽऽ! अरबाज गेल्यानंतर निक्कीची वाईट अवस्था, रडून हाल अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.