बॉलिवूड अभिनेता परवीन दाबासचा भीषण कार अपघात झाल्याची धक्कादायक बातमी काल (शनिवार २१ सप्टेंरबर) समोर आली. परवीन दाबासचा भीषण कार अपघात झाला असून त्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली. गंभीर जखमी अवस्थेत अभिनेत्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. अशातच आता नुकतेच त्याच्या तब्येतीबद्दलची अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मेडिकल अपडेटनुसार, प्रवीणला गंभीर दुखापत झाली असल्याचे सांगण्यात आले होते. त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याचे म्हटलं होतं. अभिनेत्याला आणखी दुखापत झाली आहे का, हे पाहण्यासाठी डॉक्टरांकडून सीटी स्कॅन आणि इतर चाचण्या करण्यात आल्या.
त्यानंतर झूमच्या अहवालानुसार, सूत्रांनी परवीन दाबासच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना सांगितले की, सध्या त्याच्यासाठी वैद्यकीय सेवा आवश्यक आहे. एमआरआय, सोनोग्राफी आणि एक्स-रेच्या आधारे डॉक्टर त्याच्या प्रकृतीची तपासणी करत आहेत. त्यानंतर आता त्यांची प्रकृती ठीक असून ते बोलतही आहेत. रुग्णालयात दाखल केल्यानंतर अभिनेत्याने पाठदुखी आणि गुडघेदुखीबद्दल सांगितले होते. प्रवीणच्या चेहऱ्यावर किंवा डोक्यावर कुठलीही जखम नव्हती आणि त्याच्या शरीरात रक्तस्त्रावही झालेला नाही.
परवीन दाबास हा आर्म रेसलिंग प्रो पंजा लीगचा सह-संस्थापक आहे. प्रो पंजा लीगने काल अभिनेत्याच्या अपघाताच्या निवेदनात सांगितले होते की, “प्रो पंजा लीगचे सह-संस्थापक परवीन दाबास यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे आम्हाला दुःख होत आहे. शनिवारी सकाळी झालेल्या दुर्दैवी कार अपघातानंतर त्यांना वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले”.
आणखी वाचा – The Family Man 3 मध्ये ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याची एण्ट्री, खास लूकने वेधलं लक्ष, नेमकी भूमिका काय?
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता परवीन दाबासचे वय ५० वर्ष आहे. अभिनेता अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये दिसला आहे. परवीन दाबासने आतापर्यंत ‘दिल्लगी’, ‘मान्सून वेडिंग’, ‘खोसला का घोंसला’, ‘द हीरो : लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’, ‘मैने गांधी को नही मारा’, ‘ये है जिंदगी’, ‘कुछ मीठा हो जाए’, ‘इंदू सरकार’, ‘रागिनी एमएमएस २’ आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.