बॉलिवूडमधील बिनधास्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्रीच्या यादीत अभिनेत्री काजोल हिचं नाव आवर्जून घेतलं जातं. काजोलने आजवर तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे व बोल्ड शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं असलं तरी ती अनेकदा तिच्या याच स्वभावामुळे नापसंतही झाली आहे. अशातच अभिनेत्री सध्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. काजोलच्या या स्वभावाची तुलना जया बच्चनबरोबर करत नेटकरी तुलना करताना दिसत आहेत. वास्तविक काजोल नुकतीच तिचा मुलगा युगबरोबर डॉक्टरांकडे गेली होती. तिथून निघून गेल्यावर तिने मुलगा युगचा हात धरुन स्वतःच्या सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केली. हे व्हिडीओमध्येही स्पष्टपणे दिसत आहे. काजोलची अशी वृत्ती पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला असून त्यांनी या प्रकरणावर कमेंट करायला सुरुवात केली. (Actress Kajol Troll)
एका नेटकऱ्याने व्हिडीओवर लिहिले की, “काजोल दिवसेंदिवस जया बच्चन का होत आहे?”. तर दुसऱ्या एकाने टिप्पणी करत म्हटलं की, “काजोलला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही तुमच्या स्वतःच्या सुरक्षिततेशी तडजोड केली आहे का?”. आणखी एका यूजरने लिहिले की, “ती किती गर्विष्ठ आहे, तिने स्वतःच्या गार्डला धक्का दिला”. तर एकाने असेही लिहिले की, “जो संरक्षण देत आहे त्याच व्यक्तीचा आदर केला जात नाही, हे खूप चुकीचे आहे”. तर एकाने कमेंट करत लिहिले की, “ती सुरक्षा रक्षकाबरोबर खूप विचित्र वागते. गर्विष्ठपणा खूप आहे”.
दरम्यान काजोलच्या चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहून बचाव केला असल्याचंही पाहायला मिळालं. ती तिच्या आजारी मुलामुळे काळजीत होती आणि म्हणूनच तिने हे केले असावे, असं मत तिच्या चाहत्यांनी मांडलं. व्हिडीओमध्ये युगही आजारी दिसत आहे. काजोलने काळ्या रंगाचा कुर्ता व जीन्स घातली होती आणि युगच्या चेहऱ्याकडे पाहून त्याला चालताना त्रास होत असल्याचे दिसत होते.
आणखी वाचा – योगिताला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचली आर्या, घट्ट मिठी मारली अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल
१३ सप्टेंबर रोजी युगचा १४वा वाढदिवस होता आणि काजोल-अजय देवगणने इन्स्टाग्रामवर त्यांच्या लेकासाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. काजोल व अजयचे लग्न १९९९ मध्ये झाले. त्यानंतर मुलगी नीसाचा जन्म २००३ मध्ये झाला, तर युगचा जन्म २०१० मध्ये झाला.