लोकप्रिय मराठमोळे अभिनेते दीपक शिर्के यांच्याबद्दल बोलावं तितकं कमीच. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि दीपक शिर्के यांच्या शिवाय चित्रपट पूर्ण होणे नाहीच. हा दीपक शिर्के हे सहकलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळत. दीपक यांची ‘धडाकेबाज’ चित्रपटातील बाप्पाची भूमिका प्रचंड गाजली. १९८० ते १९९० चं दशक त्यांनी खूप गाजवल होत. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि प्रेक्षकांचा लाडका बाप्पा यांच्या शिवाय त्या काळाचे चित्रपट अपूर्णच. ‘थरथराट’, ‘दे दणादण’, ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘अग्निपथ’, ‘तिरंगा’ यासारख्या अनेक चित्रपटातून दीपक यांनी आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला होता.(Laxmikant Berde Friendship)
सिनेविश्वात काम करण्यासाठी दीपक यांचा तेव्हा कुणीही वारसा नव्हता. अगदी गरिबीत जीवन जगात त्यांनी आपल्या अभिनयाची आवड जोपासली. त्यावेळी त्यांच्या पाठीशी लक्ष्मीकांत उभे राहिले असं आवर्जून नेहमी दीपक सांगतात. एका मुलाखतीदरम्यान बोलताना दीपक यांनी लक्षा बद्दल सांगताना म्हटलंय की, ‘लक्ष्मीकांत म्हणजे लाख माणूस. माझ्या व्यवसायिक आयुष्यामध्ये आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये त्याचं स्थान खूप महत्त्वाचं होतं. त्याची आठवण आल्याशिवाय अजूनही एकही दिवस जात नाही.
पाहा लक्ष्याच्या जाण्याने या अभिनेत्याने घेतला होता धक्का(Laxmikant Berde Friendship)
लक्ष्मीकांत फिल्मच्या सेटचा प्राण असायचा. नुसता धुमाकूळ. तब्येतीनं खायचा आणि खिलवण्याचा त्याला मोठा शौक. मोठा रॉयल माणूस. लक्ष्मीकांतमुळेच मला ‘टूर टूर’ हे नाटक मिळालं. या नाटकापूर्वी मी कधीच कॉमेडी हा प्रकार हाताळला नव्हता. त्यामुळे एवढ्या दिग्गज लोकांसोबत स्टेज शेअर करताना मला खूप भीती वाटत होती. पण लक्ष्मीकांतनं आणि टीमनं मला बरंच सांभाळून घेतलं. त्यामुळं तो रोल मला जमला.'(Laxmikant Berde Friendship)

लक्षाच्या शेवटच्या दिवसांबद्दल बोलत दीपक भावुक होत म्हणाले, ‘त्यानेच मला सगळं काही दिलं. त्याच्यामुळे मी इथे टिकलो. पण त्याच्या जाण्याचा माझ्यावर खूप खोलवर परिणाम झाला. त्याच्या मृत्यूनंतर मी जवळपास काम करणं बंदच केलं. मी काम घेत नव्हतो. त्याच्या त्या शेवटच्या दिवसांचा मला धक्का बसला होता. त्याने असं जायला नको होतं. त्याला त्या अवस्थेत पाहवत नव्हतं. खाणं कमी केलेलं. पण तो गेला आणि मी पण रंगभूमीपासून बराच दूर गेलो. तो गेला आणि मीही खचून गेलो.'(Laxmikant Berde Friendship)
जिवाभावाच्या मैत्रीचं यापेक्षा आणखी वेगळं काय उदाहरण असू शकत, हे दीपक आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या या किस्स्यांवरून कळत.
