बॉलिवूड तसेच टेलिव्हीजन अभिनेत्री सना खान सध्या खूपच चर्चेत आहे. सना आजवर अनेक चित्रपट तसेच कार्यक्रमांमध्ये दिसून आली आहे. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचेदेखील अनेक चाहते होते. मात्र अचानक तिने मनोरंजन क्षेत्र सोडण्याचा निर्णय तिने घेतला आणि सगळ्यांनाच एक धक्का बसला. आता ती एक धर्मगुरु म्हणून काम करताना दिसत आहे. तसेच तिने काही वर्षांपूर्वी धर्मगुरु मुफ्ती अनसबरोबर लग्नबंधनात अडकली. त्यानंतर मनोरंजन सृष्टीला तिने कायमचा रामराम केला. सध्या एका पॉडकास्टमुळे अधिक चर्चेत आली आहे. (sana khan on career)
सना आजवर ‘बॉम्बे टू गोवा’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘जय हो’ अशा चित्रपटांमध्ये दिसून आली होती. मात्र लग्नानंतर तिने धर्माला आपलंसं केलं. पण जेव्हा आता ती मागे वळून पाहत आहे तेव्हा तिने केलेल्या कामाचा राग येत असल्याचेही ती म्हणाली. नुकतीच तिने रुबिना दिलैकच्या ‘किसीने बताया नही’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिने तिच्या आधीच्या ग्लॅमरस अवताराबद्दल भाष्य केले आहे. तिने लहान कपडे घातल्याचा पश्चाताप अजूनही होत असल्याचे सांगितले. तसेच या सगळ्याची तुलना तिने सैतानाबरोबर केली आहे. तिने सांगितले कि, “मी खुश का नाही? असा प्रश्न मी स्वतःला विचारु लागले. माझ्या अभिनयाच्या कारकीर्दीमध्ये एका वाईट शक्तीने महिला म्हणून मला कधी उघडं पाडलं? हे समजलंच नाही”.
पुढे तिने नवऱ्याबद्दलदेखील भाष्य केले आणि म्हणाली की, “माझ्यापेक्षा माझा नवरा खूप वरचढ आहे. तुम्हाला त्यांची किंमत माहीत नाही. कोळशामध्ये जसा हिरा असतो तसेच ते आहेत . कधी कधी आपण खूप छान बोलतो. पण आपली देहबोली तितकी खास नसते. आमच्यामध्ये मुलगी झाली तर दयाळू असते तर मुलगा झाला तर धनवान मानला जातो. मला वाटत की अल्लाहने मला जुळी मुलं का नाही दिली? पण मला आता अल्लाहचा प्लॅन समजला आहे की मला एकच मूल का दिलं ते. तसेच मी पंजाबी ड्रेस घालणारी मुलगी होते पण मी कधी शॉर्ट स्कर्ट आणि बॅकलेस कपडे घालायला लागले ते समजलं नाही”.
तिने कुराण वाचण्याविषयीदेखील सांगितले की, “जेव्हा मी बिग बॉस १४’मधून बाहेर पडले तेव्हा हिंदी भाषांतर केलेलं कुराण वाचण्याची इच्छा झाली. हे वाचल्यामुळे माझं आयुष्यदेखील बदललं. मी तेव्हा जे काही खरेदी करायचे तेव्हा मला तात्पुरता आनंद व्हायचा. पण शांतता सोडून सगळं काही माझ्या आयुष्यात होतं. मी खुश का नाही? असा प्रश्नदेखील मी स्वतःला विचारायचे”. सध्या ती भारतात आपल्या कुटुंबासमवेत राहत आहे.