रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi च्या घरात अरबाज पुन्हा एकदा आक्रमक, स्वत:वर राग व्यक्त केला अन्…; निक्कीवरही चिडला, नेमकं काय झालं?

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 19, 2024 | 10:05 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 new promo Arbaz Patel once again offensive and expressed his anger on Nikki Tamboli.

Bigg Boss Marathi 5 च्या घरात अरबाज पटेल पुन्हा एकदा आक्रमक, निक्की तांबोळीवर व्यक्त केला राग

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या कॅप्टन्सी टास्क सुरू आहे. या आठवड्यात संपूर्ण घरात जंगलराज ही थीम असणार आहे. कॅप्टन्सी कार्यात दरवेळीप्रमाणे घरात दोन टीम्स पाडण्यात आल्या आहेत. ‘टीम ए’मध्ये निक्की, अरबाज, वर्षा, सूरज आणि धनंजय हे सदस्य आहेत. तर, ‘टीम बी’मध्ये जान्हवी, संग्राम, अंकिता, अभिजीत आणि पंढरीनाथ कांबळे हे सदस्य आहेत. हे सगळे सदस्य आता कॅप्टन्सीसाठी एकमेकांना भिडणार आहेत. या कॅप्टन्सी टास्कमध्ये आपल्याला आवडत नसलेल्या सदस्याच्या घरट्यात अंडा ताकत त्याला कॅप्टन्सीमधून बाद करायचे आहे आणि या टास्कमध्ये बुधवारच्या भागात दोन सदस्य बाद झाले आहेत, ते म्हणजे पॅडी व अंकिता. (Bigg Boss Marathi 5 New Promo)

पहिल्या फेरीत ‘ए टीम’कडून निक्की-अरबाज तर, ‘बी टीम’कडून जान्हवी-संग्राम खेळण्यासाठी जातात. मात्र, हा टास्क सुरू होण्यापूर्वी अरबाज संग्रामशी डील करतो. पहिल्या फेरीत आम्ही तुला बाद करणार नाही तू आम्हाला करू नकोस अशी डील यांच्यात होते. अरबाज अगदी सहजपणे जान्हवी, संग्रामला अडवतो आणि यामुळे निक्की अंडी उचलून अंकिता आणि पंढरीनाथ यांच्या घरट्यात टाकते. यामुळे हे दोघंही कॅप्टन्सी कार्यातून बाद होतात. अंकिता ही गोष्ट पाहिल्यावर संग्रामच्या खेळाविषयी शंका उपस्थित करते.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – 19 September Horoscope : कन्या, तूळ, मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस आनंदाचा, इतर राशींसाठी दिवस कसा? जाणून घ्या…

अशातच आता या नवीन टास्कचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्यात टास्कवरुन अरबाज अंकिततावर रागावल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये अरबाज निक्कीला आपण पहिल्या फेरीत आपण अभिजीत आणि संग्रामला बाहेर काढू असं म्हणत आहे. पण निक्की अरबाजच्या म्हणण्याप्रमाणे करत नाही. यामुळे अरबाजला राग अनावर होतो आणि तो असं म्हणतो की, “तिने मला धोका दिलाय”. निक्की “मी तिथे विसरली आणि मला पॅडी यांना नॉमिनेट करायचे होते” असं म्हणते.  यावर अरबाज तिला प्रचंड रागात “इतक्या लवकर विसरते” असं म्हणत सोफ्यावर जोरजोरात मारू लागतो.

आणखी वाचा – Himesh Reshammiya Father Death : प्रसिद्ध गायक, संगीतकार हिमेश रेशमियाच्या वडिलांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दरम्यान, अरबाजने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पुन्हा एकदा आक्रमक होण्याची ही काय पाहिलीच वेळ नाही. त्याने पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रॉपर्टीवर आपला राग व्यक्त केला आहे. त्यामुळे आता त्याला काय शिक्षा होणार आहे का? किंवा निक्कीवरचा त्याचा विश्वास पुन्हा उडणार का? तसंच अरबाज त्याच्या रागावर नियंत्रण मिळवणार का? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी भागांसाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.    

Tags: Arbaz Patelbigg boss marathi 5nikki tamboli
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi Suraj Chavan will be in the top 5 Colors Marathi programming head Kedar Shinde talked about that know the reason

सूरज टॉप ५ मध्ये असणार?, Bigg Boss Marathi चे काम पाहणाऱ्या केदार शिंदेंचं भाष्य, म्हणाले, "वोट्स येत आहेत ते पाहून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.