Navri Mile Hitlerla : झी मराठी वाहिनीवरील सर्वच मालिकांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापैकीच एक मालिका म्हणजे ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका आहे. मालिकेत येणाऱ्या अनेक रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. मालिकेचे कथानक थोडे हटके असून दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता वाढत आहे. या मालिकेत राकेश बापट हा एजे म्हणजे अभिराम जहागीरदार व वल्लरी लोंढे ही लीलाची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत एजे व लीला यांचे मनाविरुद्ध लग्न झाल्याचे पाहायला मिळाले. मनाविरुद्ध झालेल्या एजे व लीला यांच्या लग्नामुळे त्यांच्यातील प्रेमकहाणी आता हळूहळू बहरत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Navri Mile Hitlerla Marathi Serial)
सुरुवातीला एजेंच्या मोठ्या मुलानेच तिचे आपल्या वडिलांविरोधात कान भरले होते. त्यामुळे ती त्यांच्याशी तुटक वागायची. पण आता हळूहळू ती त्यांच्या प्रेमात पडू लागली आहे. एजेंचा शिस्तप्रिय स्वभाव या विरुद्ध अल्लड स्वभावाची लीला ही जोडी अगदीच एकमेकांसाठीची परफेक्ट जोडी असल्याचे प्रत्येकाच म्हणणं होतं. दोघांचे स्वभाव हे वेगवेगळे असले तरी अट दोघांना एकमेकांबद्दल प्रेम वाटत असल्याचे पहायला मिळत आहे. लीला अल्लड असली तरीही चांगली मुलगी आहे हे एजेंना पटू लागले आहे आणि एजे कितीही शिस्तप्रिय असले तरीही त्यांच्यात सुद्धा एक प्रेमळ माणूस असल्याची जाणीव लीलाला होऊ लागली आहे.
आणखी वाचा – अब्दू रोजिकचे लग्न मोडलं, पाच महिन्यांपूर्वी झाला होता साखरपुडा, म्हणाला, “योग्य वेळ आल्यावर…”
अशातच आता यांच्यातील प्रेम आणखी बहरणार असल्याचे आगामी भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेतील या नवीन ट्विस्टचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्यातून लीला गणपती बाप्पाकडे तिच्या एजेंविषयीच्या भावना व्यक्त करणार आहे. गणेशोत्सवानिमित्तच्या स्पेशल भागात या मालिकेचे शूटिंग मुंबईचा राजा गणेश मंडळात पार पडले. या गणेश गल्लीतल्या मुंबईच्या राजासमोर लीलाने तिचे एजेंवर प्रेम असल्याचे कबूल केले. मालिकेचा हा नवीन प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – Deadpool & Wolverine आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज, कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या…
या नवीन प्रोमोमध्ये लीला व एजे हे दोघे गणपतीच्या दर्शनाला गेले असताना तिथल्या गर्दीत हरवतात. त्यानंतर एजे लीलाची शोधाशोध करतात. या शोधाशोधीमध्ये लीला तिचे एजेवर प्रेम असल्याची जाणीव होते आणि यावेळी ती मला काय झालं आहे. मला सतत वाटतं की एजेंनी माझ्या जवळ असावं आणि त्यांनी माझा हात कधीच सोडू नये”. यानंतर ती गणपती बाप्पासमोर “मी एजेंच्या प्रेमात पडली आहे’ असं म्हणत कबुली देते.