Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला आता ५० दिवस झाल्यानंतर खऱ्या अर्थाने रंगत चढत असल्याचे दिसून येत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील मैत्रीचं समीकरणच बदलून गेलेलं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला एकमेकांच्या कायम बरोबर असणारे सदस्य आता स्वतःचा गेम प्लॅन करताना दिसत आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या आठव्या आठवड्याच्या सुरुवातीला अरबाज पटेल, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, सुरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशातच कलर्स मराठी वाहिनीने ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये डीपी म्हणजेच धनंजय पोवार आता स्वतःचा गेम प्लॅन करताना दिसत आहेत. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये डीपी निक्कीला सांगत आहेत की, “मी कोणत्याही टीमचा हिस्सा नाही”. पुढे डीपी, संग्रामला विचारतात, “स्ट्रॅटिजीच्या बाबतीत कोण बोलत होतं?”. त्यावर संग्राम, “तूच की” असं म्हणतो. त्यावर निक्की म्हणते, “पण दिसत नाहीये ना”. पुढे डीपी म्हणतात की, “अभिजीत आणि अंकिता या दोघांमुळे मला सावली म्हणतात ना…, मला जर दिसायचंय तर तुमच्याबरोबर खेळू शकत नाही”. त्यामुळे आता या नवीन प्रोमोवरून डीपींनी त्यांच्या खेळाची स्ट्रॅटेजी बदलेली दिसून येत आहे. त्यामुळे आता ते अभिजीत व अंकिताबरोबर खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गेले काही दिवस डीपी आपल्या ग्रुपपासून वेगळे वेगळे राहत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारच्या भागातही डीपी आपल्या ग्रुपपासू वेगळा जेवताना दिसला होता. वेगळा बसताना दिसला. यावरुन अभिजीत, पॅडी व अंकिता यांच्यात चर्चाही झाली. अशातच आता या नवीन प्रोमोमुळे डीपीने त्याचा वेगळा मार्ग निवडला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता पुढे या ग्रुपमध्ये काय होणार? हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याआधी अभिजीतच्या वागण्यामुळे तो टीमपासून दूर जातोय की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. त्यानंतर डीपी व अंकिता मध्येही काही कारणामुळे मतभेद झाले होते.
आणखी वाचा – Video : अभ्युदय नगरच्या गणपतीला कुटुंबासह आरतीला पोहोचले आदेश बांदेकर, चाळीतील जुन्या दिवसांची आठवण
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या सोमवारच्या नॉमिनेशनच्या टास्कमध्ये कमी पॉईंट्स मिळाल्याने ‘टीम ए’ थेट नॉमिनेट झाली आहे. यात एकूण पाच सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षा आणि सूरज असे पाच सदस्य थेट नॉमिनट झाले आहेत. आता यांच्यापैकी कोण घरात राहणार? आणि कोण बाहेर जाणार हे आठवड्याच्या शेवटी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.