अभिनेत्री कंगना रणौत सध्या खूप चर्चेत आहे. ‘इमर्जन्सी’ हा तिचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागील महिन्यात या चित्रपटाचा ट्रेलरदेखील प्रदर्शित करण्यात आला होता. सप्टेंबर महिन्यातील सहा तारखेला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र हा चित्रपट वादात सापडल्यामुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. या कारणामुळे कंगनाचा राग अनावर झालं आहे, चित्रपटाबद्दल ती भाष्य करताना दिसत आहे. तसेच ती अनेक बॉलिवूड कलाकारांवर टीकादेखील करताना दिसते. अशातच तिने काही कलाकारांवर राग व्यक्त केला आहे. (kangana ranaut on tabacco endorsment)
कंगनाने ‘न्यूज १८ इंडिया’बरोबर संवाद साधला. यावेळी तिने काही बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे. तिने त्यांच्यावर देशाचे नुकसान केल्याचे आरोप केले आहेत. तिने कलाकारांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच त्यांच्यावर देशातील लोकांच्या पाठीत सुरा खुपसण्यासाठी हे लोक नेहमी पुढे असतात असे सांगितले आहे. ती म्हणाली की, “बॉलिवूडने आपल्या देशाला खूप खराब केले आहे. या सगळ्यांची त्यांनी जबाबदारी घ्यावी. हे कलाकार कमाई दाखवतात आणि नंतर तंबाखूची जाहिरात करतात.
पुढे ती म्हणाली की,“त्यांचा काय नाईलाज असेल इतका की त्याना मोठ्या स्क्रीनवर तंबाखू विकावा लागेल. जेव्हा देशाच्या विरोधात काही करायचे असेल तेव्हा हे सगळे एकत्र उभे राहतात. ते पैशांच्या बदल्यात आपल्या देशाला धोका देत आहेत. ते इन्स्टाग्राम व ट्विटरव स्टोरी पोस्ट करण्यासाथी ५-१० लाख रुपये घेतात”.
याआधी चित्रपटाबद्दलदेखील भाष्य केलं आहे. ती म्हणाली की, “हा आपला इतिहास आहे जो जाणूनबुजून लपवला जात आहे. आम्हाला याबद्दल काहीही सांगितले गेले नाही. माझा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे. पण सेंसॉर बोर्डकडून परवानगी मिळाली नाही. आमच्याकडे सगळी अधिकृत व बरोबर माहिती आहे. पण अनेक जण भिंडारवालेला संत व क्रांतिकारी म्हणत आहेट. त्यांनी चित्रपटावर बंदी आणण्याची धमकी दिली आहे. मला पण धमक्या मिळाल्या आहेत”. मात्र आता हा चित्रपट प्रदर्शित कधी होणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.