Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला सुरू होऊन आता जवळपास ५० दिवस पूर्ण झाले आहेत आणि या घरातील खेळ आता आणखीनच रोमांचक होत चालला आहे. आठवा आठवडा सुरु होताच आता ही स्पर्धा दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. अशातच आठव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. आठवड्याच्या थीमनुसार घरात पहिल्याच दिवशी ‘शिकाऱ्याची बंदूक’ हे नॉमिनेशन कार्य पार पडलं. घरात नॉमिनेशन टास्क सुरू होण्यापूर्वी घरातील सगळे सदस्य काय निर्णय घ्यायचा यावर चर्चा करत होते. मात्र, ऐनवेळी ‘बिग बॉस’कडून या नॉमिनेशन कार्यात एक मोठा ट्विस्ट आणण्यात आला. (Bigg Boss Marathi 5 Nomination)
‘बिग बॉस’ने दोन गटांत घरातील सदस्यांची विभागणी केली. एका टीममध्ये निक्की, अरबाज, सूरज, वर्षा आणि जान्हवी हे पाच सदस्य होते. तर, दुसऱ्या टीममध्ये अभिजीत, अंकिता, धनंजय, पॅडी आणि संग्राम हे पाच जण होते. या दोन्ही टीममधील एकेक सदस्याला एका आखून दिलेल्या चौकोनात येऊन उभं राहून वाघाची डरकाळी होताच विशिष्ट अंतरावर ठेवलेली बंदूक घेऊन पुन्हा आपल्या चौकोनात जाऊन उभे राहायचे होते आणि विरोधी टीममधील सदस्याच्या नॉमिनेशनची कारणे सांगायची होती. या टास्कमध्ये निक्की व अंकिताची जोडी पाठवण्यात आली. यामध्ये निक्कीने बाजी मारली. दुसऱ्या फेरीत वर्षा व धनंजय या सदस्यांपैकी डीपीने बंदूक मिळवली.
यानंतर अरबाज व पॅडीच्या तिसऱ्या फेरीत अरबाजने बाजी मारली आणि बंदूक मिळवली. त्यानंतर जान्हवी व अभिजीत या जोडीत अभिजीतने चपळता दाखवत लगेच बंदूक उचलली. तर, दुसरीकडे पळत येणाऱ्या जान्हवीचा पाय घसरल्याने तिच्या पायाला दुखापत झाली. मग अखेरच्या फेरीत सूरज व संग्राम या जोडीचा सामना रंगला. पण यावेळी संग्रामच्या शक्तीपुढे सूरजची ताकद कमी पडली. त्यामुळे त्याने हा सामना जिंकत आपल्या टीमला इम्युनिटी मिळवून दिली आहे.
आणखी वाचा – 18 September Horoscope : मंगळवारच्या चंद्रग्रहणाचा कोणत्या राशीच्या लोकांवर काय परिणाम होणार? जाणून घ्या…
दरम्यान, या नॉमिनेशनच्या टास्कच्या नियमानुसार कमी पॉईंट्स मिळाल्याने टीम A थेट नॉमिनेट होते. यात एकूण पाच सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षा आणि सूरज असे पाच सदस्य थेट नॉमिनट झाले आहेत. आता यांच्यापैकी कोण घरात राहणार? आणि कोण बाहेर जाणार हे आठवड्याच्या शेवटी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.