गोविंदा व त्याचा भाचा कृष्णा अभिषेक नेहमीच त्यांच्या नात्यामुळे, नात्यातील वादामुळे चर्चेत असतात. गोविंदा व कृष्णामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मतभेद सुरु आहेत. हे मतभेद इतक्या टोक्याचे आहेत की गेल्या काही वर्षांपासून दोघं एकमेकांच्या संपर्कात आलेले नाहीत. या वादावर आता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने केलेलं भाष्यही चर्चेत आलं आहे. सुनीता आहुजाचे कृष्णा अभिषेक व कश्मिरा शाहबरोबर चांगले संबंध नाहीत. आणि आता तिने याचा खुलासाही केला आहे. गोविंदाच्या पत्नीला त्यांच्या या नात्याबाबत विचारताच तिने अगदी मनमोकळेपणाने यावर भाष्य केलं. (Govinda Wife Reaction On Kapil Sharma Show)
अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कपिल शर्माच्या शोबद्दल सांगितले. तिला अर्चना पूरण सिंगची जागा घ्यायची आहे का असे विचारले असता तिने कश्मिरा व कृष्णा अभिषेकचा उल्लेख करत प्रश्नाचे उत्तर दिले. ‘टाईम आऊट विथ अंकित पॉडकास्ट’मध्ये सुनीता आहुजाला विचारण्यात आले होते की, “ती कपिल शर्माच्या शोमध्ये अर्चना पूरण सिंहची जागा घेणार का? भविष्यात तिला ऑफर आली तर ती घेणार का?”. यावर उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, “माझं काश्मिरा व कृष्णाबरोबर जमत नाही”. “असे का?”, असे विचारले असता सुनीता आहुजा यांनी याला कौटुंबिक कलह म्हटले आणि या संपूर्ण प्रकरणाबाबत चर्चा करण्यास काही तास लागतील असे सांगितले.
सुनीता पुढे म्हणाली की, “जेव्हा तिच्याकडून चूक होते तेव्हा ती माफी मागायला कमी पडत नाही, पण जर तिची चूक नसेल तर ती त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडेही पाहत नाही”. याच पॉडकास्टमध्ये सुनीता आहुजा म्हणाली, “मी गेल्या १५ वर्षांपासून माझ्या बहिणींचे चेहरे पाहिलेले नाहीत. एकदा मनात द्वेष निर्माण झाला की तो माझ्यासाठी संपत नाही”.
काही महिन्यांपूर्वी कृष्णा अभिषेकची बहीण आरतीच्या लग्नाला गोविंदाला आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी भाचीच्या लग्नाला गोविंदाने खास अंदाजात हजेरी लावली. कृष्णाने आरतीच्या विशेष दिवसासाठी त्यांच्या कुटुंबातील एकतेवर विश्वास व्यक्त केला होता. तो म्हणाला होता की, “सगळ्यात पहिलं निमंत्रण हे मामाला देण्यात येईल. तो माझा मामा आहे, आमच्यात काही मतभेद झाले आहेत जो एक वेगळा मुद्दा आहे पण पहिली लग्नपत्रिका त्यांच्याकडे जाईल आणि तो निश्चितपणे लग्नाला उपस्थित राहणार आहे” असंही तो म्हणाला होता.