Bigg Boss Marathi 5 : कोणत्याही बापासाठी आपल्या लेकींपासून एक दिवसही लांब राहणे अशक्य असते. अशा काळात लेकींपासून तब्बल शंभर दिवस लांब राहण्याचा प्रवास सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील मंडळी करत आहेत. त्यामुळे साहजिकच ‘बिग बॉस’मधील वडिलांना आपल्या मुलांची आठवण येत आहे. अशातच रविवारच्या ‘बिग बॉस मराठी’च्या भाऊचा धक्कामध्ये रितेश देशमुखने सर्व सदस्यांना त्यांच्या कुटुंबियांचा व्हिडीओ दाखवला. यावेळी घरातील सर्वच स्पर्धक तब्बल दीड महिन्यानंतर आपल्या कुटुंबीयांना पाहून भावुक झाले. कुटुंबीयांना पाहिल्यानंतर अंकिता, अभिजीत, डीपी, अरबाज व पॅडी हे सदस्य खूपच भावुक झाले. यावेळी पंढरीनाथ यांना पाहून त्यांची लेक ग्रिष्मा कांबळेने आपल्या बाबाला धीर दिला आणि त्याच्या खेळाचं कौतुकही केलं. (Bigg Boss Marathi 5 Paddy Kamble Emotional)
यावेळी ग्रिष्मा असं म्हणाली की, “बाबा कसा आहेस? घरची अजिबात काळजी करु नकोस. आम्ही सगळे मजेत आहोत. खरंतर सणवारानिमित्त तुझी जास्त आठवण येत आहे. पण बिग बॉसच्या घरातला तुझा आतापर्यंतचा खंबीर प्रवास पाहून यापुढचे शंभर दिवस काढायला आम्हाला काही हरकत नाही. कारण तो विश्वास तू आम्हाला दिला आहेस. शंभराव्या दिवशी नक्की भेटू. आम्हाला तुझी खूप आठवण येत आहे”. या व्हिडिओदरम्यान, पॅडी व त्यांच्या लेकींचे काही खास फोटोही दाखवण्यात आले. यामध्ये बापलेकींचे काही अनमोल क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळाले. मुलीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर पॅडी कांबळेही खूप भावुक झाले.
पण भावुक होऊनची त्यांनी स्वतःला सावरलं आणि असं म्हटलं की, “त्यांना माहिती आहे बाबा काही चुकीचं वागणार नाही. बाबा काही चुकीचं करणार नाही. बाबा जसा आहे तसा तिकडे गेममध्ये करणार. कारण त्यांना तो विश्वास आहे आणि त्याच विश्वासाच्या जोरावर मी इथे खेळतोय. मला त्यांचीही खूप आठवण येतेय. पण शंभर दिवसांनी नक्की भेटूया.” यानंतर पंढरीनाथने रितेशला मिठी मारतात. यावेळी घरचे सगळेच भावनिक होतात. ग्रिष्मा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या या फोटो व व्हिडिओलाअ नेटकऱ्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असतो.
दरम्यान, पॅडी कांबळे सध्या ‘बिग बॉस’च्या घरात असल्यामुळे ती ‘बिग बॉस’बद्दलची मतंही सोशल मीडियावर व्यक्त करत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने पंढरीनाथ कांबळे यांचा अपमान केला होता, तेव्हा ग्रिष्माने बाबाच्या समर्थनार्थ भली मोठी पोस्ट सोशल मीडियावर लिहिली होती. तिने या पोस्टमधून जान्हवीची चांगलीच शाळा घेतली होती आणि तिची ही पोस्ट अनेकांनी शेअर करत तिला पाठींबादेखील दिला होता.