शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मायरा वायकुळला झाला भाऊ, आईने चिमुकल्याला जन्म देताच आनंद गगनात मावेना, फोटो व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 15, 2024 | 4:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Majhi tujhi reshimgath serial fame actress myra vaikul aka pari blessed with brother

मायरा वायकुळला झाला भाऊ, आनंद गगनात मावेना, फोटो शेअर करत दिली खुशखबर

झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली परी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ. सोशल मीडियावरुन प्रेक्षकांपर्यंत पोहचलेल्या मायराने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केलं. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालितकेमुळे ती मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा बनली. या मालिकेनंतर ती अनेक जाहिराती आणि इतर कार्यक्रमांतही झळकली. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या मायराने लहान वयात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळंच स्थान निर्माण केलं. काही दिवसांपूर्वी मायराच्या आई-वडिलांनी खुशखबर दिली होती. मायरा मोठी बहीण होणार असल्याची आनंदवार्ता त्यांनी सांगितली होती.

गुढीपाडवा आणि नववर्षाच्या पहिल्या दिवशी मायराच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत त्यांनी ही गोड बातमी शेअर केली होती. त्यावेळी मायराची आई श्वेता वायकुळ सप्टेंबर महिन्यात दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार असल्याचं म्हटलं होतं आणि अखेर मायराच्या आईने बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे मायराला भाऊ झाला असून आता मायरा ताई म्हणून मिरवणार आहे. मायराच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे तिच्या लहान भावाबद्दलची गुडन्यूज शेअर करण्यात आली आहे. “आमचा छोटा सुपरहिरो आला आहे” असं म्हणत मायराने लाडक्या भावाबद्दलची खुशखबर दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Myra Vaikul (@_world_of_myra_official)

आणखी वाचा – Video : मुलीला जन्म दिल्यानंतर दीपिका पदुकोणला रुग्णालयातून डिस्चार्ज, पती रणवीर व चिमुकलीसह घरी परतली अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल

मायराच्या रील्सला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते. एखादा सण असो किंवा खास दिवस… मायराचे हटके फोटो किंवा व्हिडीओ या अकाऊंटद्वारे शेअर केले जातात. अशातच त्यांनी ही गुडन्यूजदेखील शेअर केली आहे. यानिमित्ताने मायराने खास फोटो शेअर केले असून या फोटोमध्ये काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. तिने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये तिच्या हातात ‘बेबी बॉय’ लिहलेला एक बोर्ड आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिच्यामागे आई-वडील असलेले पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “आर्यावर अन्याय होत आहे”, ‘बिग बॉस’ने घेतलेल्या निर्णयावर प्रेक्षक नाराज, शो न बघण्याचा पवित्रा घेत म्हणाले, “आम्ही निषेध करतो की…”

दरम्यान, मायराच्या या फोटोला अनेकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोखाली कलाविश्वातील अनेक कलाकारांनी कमेंट्स करत मायराचे व तिच्या आई-वडिलांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी मालिका व मराठी चित्रपटांमधुन प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या मायराने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशातच आता तिच्या आयुष्यात आलेल्या लहान भावामुळे तिचा आनंद द्विगुणित झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही.

Tags: Majhi Tushi Reshmigathmyra vaikulMyra Vaikul BrotherMyra Vaikul Brother News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Today Elimination

Bigg Boss Marathi : “एलिमिनेशनचा निर्णय माझ्यासाठी अवघड”, रितेश देशमुख असं का म्हणाला?, नवीन प्रोमोने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.