Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नियमभंग केल्यामुळे आर्या जाधवला घराबाहेर काढण्यात आलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात हिंसा करत मूलभूत नियम मोडल्यामुळे आर्याला घराबाहेर काढण्यात आलं आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की आणि आर्यामध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर आर्याने निक्कीला ‘मी तुला मारीन’ असं म्हटलं. त्यानंतर त्यांच्यातील वाद टोकाला गेला आणि आर्याने निक्कीवर हात उचलला. आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. ‘बिग बॉस’च्या घरात निक्कीवर हात उचलून हिंसा केल्यामुळे आर्याला घराबाहेरचा रस्ता दखवण्यात आला आहे. घरातील इतर सदस्यांनी आर्याच्या हिंसेचं समर्थन केलं नाही, पण तिला तिची चूक समजावण्याचा प्रयत्न केला. (Aarya Jadhav Elimination)
आर्याला घराबाहेर काढण्यात आल्याच्या निर्णयावर अनेक चाहते मंडळी व प्रेक्षक नाराज झाले असून त्यांनी ‘बिग बॉस’ न बघण्याचा निर्णय घेतला आहे. कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी आपली मतं व्यक्त केली असून प्रत्येकाने आर्याला पाठींबा देत तिच्यावर अन्याय झाला आहे असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर देखील यांचे प्रतिसाद उमटताना दिसत आहेत. “आर्याने जे केलं ते बरोबरच केलं”, “कोणीतरी निक्कीचं थोबाड फोडणं गरजेचं होतं”, “अख्खा महाराष्ट्र आर्याबरोबर आहे”, “आर्यानी चुक केली, परत २ हाणायला पाहिजे होत्या”.
याचबरोबर “आता आम्ही हा शो बघायचं बंद करणार”, “निक्कीचा ‘बिग बॉस’ चालू आहे”, “बाय बाय निक्की तांबोळीचा बिग बॉस”, “आर्याला जर बाहेर काढलं तर आम्ही बिग बॉस पाहणार नाही ही गोष्ट बिग बॉसने ध्यानात ठेवावी”, “निक्कीनं काय पण केलं तर चालतंय, पणं तेचं दुसऱ्याने केल्यावर चालतं नाही”, ‘आतापर्यंत निक्कीने काय काय नियम मोडलेत, तरी तिला काय शिक्षा नाही”, “बिग बॉसच्या एकतर्फी निर्णयाचा आम्ही निषेध करतो” अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

टास्क दरम्यान झालेल्या वादात आर्याने थेट निक्कीच्या कानशिलात लगावली. यानंतर पुन्हा एकदा निक्की मोठा हंगामा करताना दिसली होती. मला न्याय हवा, बिग बॉस आर्याला बाहेर काढा, असं निक्कीने म्हटलं होतं. त्यानंतर शनिवारच्या ‘भाऊचा धक्का’मध्ये आर्याला ‘बिग बॉस’ने घरातून तत्काळ बाहेर निघून जाण्याची शिक्षा दिली. अगदी कुणालाही निरोप देण्याची संधी न देताच आर्याला या घराच्या बाहेर काढण्यात आलं. यामुळे आता प्रेक्षक मंडळी प्रचंड संतापली आहेत.