Tharla Tar Mag New Promo : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका कायमच पहिल्या क्रमांकावर असलेली पाहायला मिळाली. मालिकेतील सर्व पात्रांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांकडून या मालिकेला भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेतील अर्जुन-सायलीच्या नात्यातील गोडवा प्रेक्षकांना खूप भावतो. दरम्यान, मालिकेत काही दिवसांपूर्वीच प्रतिमाची एण्ट्री झालेली पाहायला मिळाली.
प्रतिमाच्या एण्ट्रीनंतर मालिकेत सायली तिच्या अगदी जवळ जाताना दिसली. याउलट तिची लेक तन्वी मात्र तिच्या जवळ जात, तिला मायेने गोंजारताना कुठेच दिसली नाही. त्यामुळे काही दिवांपासून मालिकेत अर्जुनला प्रियावर म्हणजेच खोट्या तन्वीवर संशय आला आहे. जन्मदात्री आई इतक्या वर्षांनी सापडूनही तिच्या मनात माया का नाही, असा प्रश्न अर्जुनला पडला असून यामागे नेमकं काय खरं आहे याचा शोध घेण्याचं तो ठरवतो. मनातील ही शंका अर्जुन सायलीसमोर बोलूनही दाखवतो. यावर सायली सांगते की, “तिच्या मनातच कटुता भरली आहे. प्रिया हीच खरी तन्वी आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही डोक्यातून संशयाचा भुंगा काढून टाकावा”. पुढे सायली अर्जुनला असेही म्हणते की, “रविराज काकांनी पुरावे पाहूनच या गोष्टीवर विश्वास ठेवला असेल. त्यांच्याासारख्या निष्णात वकिलाला सहजासहजी फसवणं सोपं आहे का?”.
आणखी वाचा – मेहता की अरोरा?, मृत्यूनंतर मलायका अरोराच्या वडिलांच्या आडनावाचा गोंधळ, नेमकं खरं काय?
सायलीने असं सांगूनही अर्जुनला काही राहवत नाही. त्यामुळे अर्जुन सुमनला भेटायला जातो. कारण प्रियाच तन्वी आहे हे सत्य सुमनने साऱ्यांना सांगितलेलं असतं. आणि हे नेमकं कशामुळे सांगितलं आहे याचा शोध अर्जुनला घ्यायचा असतो. समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अर्जुन सुमनकडे जातो आणि म्हणतो, “नाही म्हणजे, सुमन काकू तुम्हाला मानलं पाहिजे. प्रियाच तन्वी आहे, हे तुम्ही ओळखलंत ना. सिंपली ग्रेट”. असं म्हणत अर्जुन सुमनकडून गोष्टी वदवून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यावर सुमन म्हणते, “अरे सोप्प आहे. तन्वीच्या उजव्या पायावर जन्मखूण नाहीये का. त्यावरुनच तर ओळखलं”, असं सुमन ओघाओघात बोलून जाते. त्यावर अर्जुन सावध होतो आणि आता काहीही करुन ती जन्मखूण बघायलाच हवी, असं मनात म्हणतो.
त्यानंतर अर्जुन तातडीने घरी येतो. कारण प्रतिमा व सायलीची जवळीक पाहून त्याला सायली खरी तन्वी असल्याचं वाटतं. आणि याच संशयापायी तो घरी येतो. त्यावेळी सायली बेडवर झोपलेली असते. मात्र अंथरुणात चादरीतून तिचे उघडे पाय दिसत असतात. त्या पायांवरील जन्मखूणही अर्जुनला दिसते आणि तो हैराण होतो. आता अर्जुन प्रियाच पितळ उघड पडत सायली म्हणजेच खऱ्या तन्वीच सत्य कसं समोर आणणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.