रविवार, जून 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मेहता की अरोरा?, मृत्यूनंतर मलायका अरोराच्या वडिलांच्या आडनावाचा गोंधळ, नेमकं खरं काय?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 14, 2024 | 3:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Malaika Arora Father Name

मलायका अरोराच्या वडिलांचं आडनाव नेमकं आहे तरी काय?

मलायका अरोरा सध्या मोठ्या धक्क्यातून जात आहे. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास अभिनेत्रीच्या वडिलांनी मुंबईतील राहत्या घराच्या छतावरुन उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना घडली तेव्हा मलायका पुण्यात होती. या घटनेबाबत कळताच ती तात्काळ मुंबईच्या दिशेने रवाना झाली. मलायकाने सोशल मीडियावर तिच्या वडिलांच्या दुःखद निधनाची माहिती दिली, ज्यामध्ये तिने तिच्या वडिलांचे नाव अनिल कुलदीप मेहता असल्याचे सांगितले. या पोस्टमध्ये मलायकाने तिच्या वडिलांच्या जाण्याचे दुःख शेअर केले आणि कुटुंबासाठी गोपनीयतेची मागणीही केली. (Malaika Arora Father Name)

मलायकाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “आम्ही अत्यंत दु:खी मनाने घोषणा करत आहोत की आमचे प्रिय वडील अनिल मेहता आता आमच्यात राहिले नाहीत. तो एक सौम्य आत्मा, एक चांगला पिता, एक प्रेमळ पती आणि आमचा सर्वात चांगला मित्र होता”. मलायकाने पुढे लिहिले की, “आम्ही गमावलेल्या गोष्टींमुळे आमचे कुटुंब काळजीमध्ये आहे, त्यामुळे मी माध्यमांना व माझ्या हितचिंतकांना विनंती करते की, त्यांनी आमच्या गोपनीयतेची काळजी घ्यावी. कारण आमच्यासाठी हा कठीण काळ आहे. आम्ही तुमची समज, समर्थन आणि आदर याला प्रोत्साहन देत आहोत”. या पोस्टवर लोकांनी तिला या दु:खाच्या काळात धीर धरण्याचा सल्ला दिला, मात्र अनेकांनी तिच्या आडनावावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा – गावच्या मातीमध्ये रमली मुग्धा वैशंपायन, लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सवात उकडीचे मोदकही बनवले अन्…; साध्या राहणीमानाने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

आता या आडनाव आणि जन्मतारखेने सर्वांच्या मनात मोठा प्रश्न निर्माण केला आहे. प्रत्येकाला याबाबतचे सत्य जाणून घ्यायचे आहे. खरं तर, आत्तापर्यंत मलायकाच्या वडिलांचा उल्लेख अनिल अरोरा असा केला जायचा. दोन्ही मुलींच्या नावाबरोबर आडनावही अरोरा असल्याने ‘मेहता’ या आडनावाबाबत लोक प्रश्न विचारु लागले. सोशल मीडियापासून ते सर्व जनतेमध्ये याबाबत प्रचंड संभ्रम आहे. खरं तर, जर वाढदिवसाची तारीख योग्य मानली तर मलायका आणि तिच्या वडिलांच्या वयात फक्त १२ वर्षांचा फरक आहे.

आणखी वाचा – “नीट दिसत नाही…”, निक्की-आर्याच्या ‘त्या’ व्हिडीओवरुन सुरेखा कुडचींची पोस्ट, म्हणाल्या, “तेच उचलून धरलं आणि…”

मलायकाच्या वडिलांच्या नावाबाबत लोकांनी असेही विचारले की तिचे आडनाव अरोरा आणि वडिलांचे आडनाव मेहता कसे असू शकते?. तर अनिल मेहता हे तिचे सावत्र वडील असल्याचा अंदाज अनेकांनी बांधला आहे.

Tags: malaika aroraMalaika Arora Father DeathMalaika Arora Father Name
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
esha deol on bad touch

“भर गर्दीतही चुकीचा स्पर्श केला अन्...”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला १४ वर्षांपूर्वीचा अनुभव, म्हणाली...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.