मलायका अरोरा सध्या मोठ्या धक्क्यातून जात आहे. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास अभिनेत्रीच्या वडिलांनी मुंबईतील राहत्या घराच्या छतावरुन उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना घडली तेव्हा मलायका पुण्यात होती. या घटनेबाबत कळताच ती तात्काळ मुंबईच्या दिशेने रवाना झाली. मलायकाने सोशल मीडियावर तिच्या वडिलांच्या दुःखद निधनाची माहिती दिली, ज्यामध्ये तिने तिच्या वडिलांचे नाव अनिल कुलदीप मेहता असल्याचे सांगितले. या पोस्टमध्ये मलायकाने तिच्या वडिलांच्या जाण्याचे दुःख शेअर केले आणि कुटुंबासाठी गोपनीयतेची मागणीही केली. (Malaika Arora Father Name)
मलायकाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “आम्ही अत्यंत दु:खी मनाने घोषणा करत आहोत की आमचे प्रिय वडील अनिल मेहता आता आमच्यात राहिले नाहीत. तो एक सौम्य आत्मा, एक चांगला पिता, एक प्रेमळ पती आणि आमचा सर्वात चांगला मित्र होता”. मलायकाने पुढे लिहिले की, “आम्ही गमावलेल्या गोष्टींमुळे आमचे कुटुंब काळजीमध्ये आहे, त्यामुळे मी माध्यमांना व माझ्या हितचिंतकांना विनंती करते की, त्यांनी आमच्या गोपनीयतेची काळजी घ्यावी. कारण आमच्यासाठी हा कठीण काळ आहे. आम्ही तुमची समज, समर्थन आणि आदर याला प्रोत्साहन देत आहोत”. या पोस्टवर लोकांनी तिला या दु:खाच्या काळात धीर धरण्याचा सल्ला दिला, मात्र अनेकांनी तिच्या आडनावावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.
आता या आडनाव आणि जन्मतारखेने सर्वांच्या मनात मोठा प्रश्न निर्माण केला आहे. प्रत्येकाला याबाबतचे सत्य जाणून घ्यायचे आहे. खरं तर, आत्तापर्यंत मलायकाच्या वडिलांचा उल्लेख अनिल अरोरा असा केला जायचा. दोन्ही मुलींच्या नावाबरोबर आडनावही अरोरा असल्याने ‘मेहता’ या आडनावाबाबत लोक प्रश्न विचारु लागले. सोशल मीडियापासून ते सर्व जनतेमध्ये याबाबत प्रचंड संभ्रम आहे. खरं तर, जर वाढदिवसाची तारीख योग्य मानली तर मलायका आणि तिच्या वडिलांच्या वयात फक्त १२ वर्षांचा फरक आहे.
मलायकाच्या वडिलांच्या नावाबाबत लोकांनी असेही विचारले की तिचे आडनाव अरोरा आणि वडिलांचे आडनाव मेहता कसे असू शकते?. तर अनिल मेहता हे तिचे सावत्र वडील असल्याचा अंदाज अनेकांनी बांधला आहे.