Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या या नवीन पर्वाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या घरातील सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणचा साधेपणा लोकांना भावतो आहे. नुकत्याच पार पडलेल्या गणपती विशेष भागात सूरजने केलेल्या कृतीने अनेकांची मनं जिंकली. गणेशोत्सवानिमित्त झालेल्या विशेष भागात ‘बिग बॉस मराठी’च्या स्पर्धकांना उकडीचे मोदक देण्यात आले होते. यावेळी सगळ्यांनीची मोदक खाल्ले. यावेळी सूरजलादेखील मोदक देण्यात आला, तेव्हा “एक मोदक गणपती बाप्पाला दिला तर चालेल का?” असं सूरज म्हणाला आणि त्याची हीच कृती कौतुकास्पद ठरली. सूरज चव्हाणने स्वत: मोदक खाण्याआधी गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून ठेवला. त्याच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक झालं. (Arbaaz and Vaibhav Gossip on Suraj)
सूरजच्या या छोट्याश्या कृतीवर नेटकऱ्यांनी “एकच मन आहे किती वेळा जिंकणार”, ‘सूरज भावा तुला फुल्ल सपोर्ट”, याच साधेपणामुळे आम्ही सूरजचे कट्टर फॅन आहोत” अशा कमेंट्स करत त्याचं कौतुक केलं. अशातच नुकत्याच झालेल्या कोईन्सच्या टास्कमध्ये “मी साधा माणूस आहे. मला पिझ्झा, बर्गर नाही तर भाकरी-कालवण आवडतं” असं म्हटलं. ‘बिग बॉस’च्या घरात शुक्रवारच्या भागात ज्यांच्याकडे सर्वात जास्त कॉईन्स आहेत त्या कोणत्याही स्पर्धकाला एखादा लक्झरी पदार्थ विकत घेण्याची संधी ‘बिग बॉस’ने दिली होती. यात केक, बिर्याणी आणि पिझ्झा असे तीन पदार्थ असतात. मात्र सूरज यापैकी कोणताही पदार्थ विकत घेण्यास स्पष्ट असा नकार देतो. सूरजचा हा साधा भोळा त्याच्या चाहत्यांना, महाराष्ट्रातील जनतेला आवडत असला तरी घरातील अरबाज व वैभव यांना सूरजबद्दल असूया वाटत आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातून नक्की कोण बाहेर जाणार? ‘त्या’ कृतीमुळे आर्या ठरणार का नॉमिनेशनची बळी?
याबद्दल त्यांनी शुक्रवारच्या भागात सूरजबद्दल गॉसिप केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अरबाज वैभवला असं म्हणाला की, “त्याला सगळं काही कळतं. मी तुला सांगतो तो खूप शहाणा आहे. त्याने गणपती बाप्पाजवळ मोदक ठेवला. तिथे जाऊन पाया पडला. त्यामुळे रितेश भाऊंनी पण त्याचे कौतुक केलं. पण त्याला सगळं काही कळतं. तो साधा माणूस आहे तर त्याला हे कसं कळलं की टास्कमध्ये वैभवने पॅडी दादाला शिवी दिली”.
यावर वैभवदेखील अरबाजबद्दल असं म्हणतो की, “त्याच्याबद्दल माझं म्हणणं चुकीचे असावं. मी जो विचार करतोय तो चुकीचा असावा. त्याचं वागणं खरं असावं आणि आपण चुकीचे असावे”. दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात सातव्या आठडव्यात निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर आणि आर्या जाधव हे सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता यांच्यापैकी घरात कोण राहणार आणि कोणता सदस्य या घराचा निरोप घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.