बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’चा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अगदी पहिल्या दिवसापासूनच या शोमध्ये नवनवीन ड्रामा, भांडणं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचंही भरभरुन मनोरंजन होतं आहे. स्पर्धकमंडळी स्वतःला सिद्ध करताना कोणत्याही थराला जाताना दिसत आहेत. सहाव्या आठवड्यात ‘बिग बॉस’चा खेळ चांगलाच रंगत आहे. ‘बिग बॉस’च घर म्हटलं की वाद हे आलेच. ‘बिग बॉस’च्या घरातील या वादात आता भर घालत पुन्हा एकदा वर्षा उसगांवकर व निक्की तांबोळी यांचं वाजलं आहे. (Bigg Boss Marathi Season 5)
‘बिग बॉस’च्या घरात पहिल्याच दिवशी अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळी यांच्यात वादाची ठिणगी पडली. हा वाद पुढील भागात आणखी वाढला. मात्र कालांतराने एकाच घरात राहत असल्याने हा वाद निवळला. दोघीही एकत्र आलेल्या दिसल्या. वर्षा ताईंनी निक्कीला माफही केलेलं पाहायला मिळालं. मात्र आता पुन्हा एकदा वर्षा व निक्की यांच्यातील वाद पेटला असल्याचं समोर आलं आहे. हा वाद का पेटला याचा प्रोमो समोर आला आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये किचन मधील कामावरुन निक्की वर्षा ताईंशी भांडताना दिसत आहे. वर्षा ताईंनी जेवण करताना भाज्या कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलेल्या असतात यावरुन निक्की जाब विचारताना दाखवत आहे.
आणखी वाचा – प्रथमेश-मुग्धा पोहोचले कोकणात, परंपरा जपत एन्जॉय करत आहेत लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव, फोटो समोर
प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, “इथे लोकांना अन्न मिळत नाही. आणि या भाज्या फेकून देत आहेत”, असं म्हणत निक्की कचऱ्याच्या डब्यातून भाज्या काढून दाखवते. यावर उत्तर देत वर्षा ताई म्हणतात, “कारण मला ती खराब वाटते”. यावर निक्की म्हणते, “तुम्ही किती वाईट स्वभावाच्या आहात हे दिसलं आहे”. यावर वर्षा ताई निक्कीला म्हणतात, “उगीच आरडाओरडा करुन काही सिद्ध होणार नाही”. तेव्हा निक्की अरेरावी करत, “चला बाहेर जा मग. इथे येऊन बोंबाबोंब करु नका”.
आणखी वाचा – अरबाज पाठोपाठ सोहेल खानचंही वाजणार?, मिस्ट्री गर्लबरोबरचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं प्रकरण काय?
‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक मंडळी एकत्र जेवण बनवताना दिसतात. त्यांना स्वतःच्या हाताने शिजवून अन्न खावे लागते. त्यामुळे बरेचदा जेवण करताना प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात, आणि म्हणूनच स्पर्धकांमध्ये बाचाबाची होते. एखाद्याला कोणाची पद्धत आवडते तर एखाद्याला आवडत नाही यावरुन स्पर्धक मंडळी भांडणही करताना दिसतात.