सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधून सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार मंडळीही गणेशोत्सव अगदी दणक्यात साजरे करताना दिसत आहेत. अनेक कलाकारांच्या घरी गणेशाचे आगमन झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्याने सासरवाडीला जात गणरायाचे दर्शन घेतले. हा अभिनेता म्हणजे सर्वांचा लाडका दगडू प्रथमेश परब. प्रथमेश परबने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन सासरवाडीला दर्शनाला गेला असल्याचा फोटो शेअर केला आहे. यावरुन यंदाचा गणेशोत्सव तो बायकोच्या घरी श्रीवर्धन येथे साजरा करणार असल्याचं दिसत आहे. (Prathamesh Parab ganeshostav)
प्रथमेश व क्षितिजा यांचे फोटो देखील बरेच व्हायरल झालेले पाहायला मिळतात. क्षितिजा व प्रथमेश सोशल मीडियावर सक्रिय असतातच आणि ते त्यांच्या चाहत्यांबरोबर नेहमीच काही ना काही शेअर करत असतात. अशातच प्रथमेश सध्या श्रीवर्धन येथे गेला असल्याचं त्याच्या सोशल मीडिया स्टोरीवरुन पाहायला मिळत आहे. बायकोच्या माहेरी प्रथमेश गेला असल्याचं समोर आलं आहे. लग्नानंतरच्या सणाला म्हणजेच वटपौर्णिमेनिमित्त प्रथमेश व क्षितिजा यांनी श्रीवर्धन गाठलेलं पाहायला मिळालं. बायकोची पहिली वटपौर्णिमा साजरी करतानाचे अनेक फोटो देखील प्रथमेशने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरुन शेअर केले आहेत.
आणखी वाचा – मुलगी झाली हो! गणेशोत्सवादरम्यानच दीपिका-रणवीरच्या घरी चिमुकलीचे आगमन, गोंडस मुलीला दिला जन्म

यानंतर आता प्रथमेश गणेशोत्सवासाठी बायकोच्या घरी पोहोचला आहे. घरच्या बाप्पाचे दर्शन घेतानाचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. यावेळी प्रथमेश व क्षितिजा यांचा पारंपरिक अंदाज अधिक लक्षवेधी ठरला. क्षितिजाने हिरव्या रंगाची सुंदर अशी साडी नेसली होती तर प्रथमेशने कुर्ता पायजमा घातला होता. प्रथमेशने श्रीवर्धन मधील सुंदर अशा सकाळचाही व्हिडीओ शेअर केला .
व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधत या जोडीने त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. प्रेमाची कबुली दिल्यानंतर तीन वर्षांनी या जोडीने लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. अखेर २४ फेब्रुवारी २०२४ रोजी ही जोडी लग्नबंधनात अडकली. मराठी सिनेसृष्टीतील रोमांटिक जोडीपैकी एक जोडी म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब आणि त्याची पत्नी क्षितिजा घोसाळकर. प्रथमेशची पत्नीही अभिनयाक्षेत्रात कार्यरत नसली तरी ती मॉडेलिंगद्वारे वा सोशल मीडियावरुन बऱ्यापैकी सक्रिय असते.