शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi च्या घरात डीपीला वाटतेय एकटेपणाची भावना, ग्रुपमध्ये एकटा पडल्यानंतर आता घन:श्यामनेही दिलेला शब्द फिरवला

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 6, 2024 | 11:26 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates DP aka Dhananjay Powar feels lonely and Ghanshyam Darawade also lied to him

Bigg Boss Marathi 5 घ्या घरात डीपीला वाटतोय एकाकीपणा, ग्रुपने साथ सोडली अन्...; घन:श्यामनेही शब्द फिरवला

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गुरुवारी कॅप्टन्सीचा टास्क पार पडला. बसमधील सीटवर बसण्याचा हा टास्क असतो. खेळातील १२ स्पर्धकांनी ‘बिग बॉस’ने ठेवलेल्या ११ सीटवर धावत जाऊन बसायचे आणि जो १ स्पर्धक शिल्लक राहील तो कॅप्टनपदाच्या स्पर्धेतून बाद होईल. तो बाद झालेला स्पर्धक पुढील फेरीत तिकिट चेकर होणार आणि या तिकिट चेकरकडे अधिकार असणार की, जो दुसऱ्या फेरीत बाद होईल त्याला तो सदस्यांची अदलाबदल करू शकतो. पहिल्या फेरीत वर्षा उसगांवकर पाय दुखल्याचा अभिनय करतात, कारण त्यांचा पहिल्या फेरीत बाद होण्याचा प्लॅन असतो, मात्र त्यांचा हा प्लॅन फसतो. तर निक्की मुद्दाम सीटवर बसत नाही आणि स्वत:हून बाद होते. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)

दुसऱ्या फेरीत अभिजीत सीटवर बसण्यासाठी पोहोचू शकत नाही. त्यामुळे निक्की त्याला बाद करते आणि यावरुन त्यांच्यात वाद होतात. यानंतर तिसऱ्या फेरीत घन:श्याम बाद होतो, पण तिकिट चेकर अभिजीत त्याला रिप्लेस करुन अरबाजला बाद करतो. चौथ्या फेरीत दोन स्पर्धक बाद होतील असे बिग बॉस जाहीर करतात. त्यावेळी वर्षा आणि जान्हवी बाद होतात. अरबाज तिकिट चेकर असल्याने वर्षा-जान्हवीला सीटवर बसवून तो पॅडी व घन:श्यामला बाहेर काढतो. त्यानंतर बहुमताने घन:श्याम तिकिट चेकर होतो. त्यानंतर पाचव्या फेरीत अंकिता व सूरज असे दोन स्पर्धक बाद होतात. तेव्हा घन:श्याम त्या दोघांनाही सुरक्षित करुन धनंजय-आर्याला बाद करतो.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi चा चौथा कॅप्टन बनला गोलीगत सूरज चव्हाण, सलग तीन आठवडे नॉमिनेटेड असूनही मिळवले कॅप्टन पद

यावरून डीपी घन:श्यामवर नाराज होतात. कारण आधी झालेल्या चर्चेत डीपी घन:श्यामला  असं म्हणालेले असतात की, “माझा विचार आहे का डोक्यात?, कारण गेल्या आठवड्यात तुझ्या डोक्यात जशी इच्छा होती, तशी आता माझी ही आहे आणि गेल्या आठडव्यात आपण दोघे नॉमिनेशनमध्ये आहोत. तुला वाटलं तर तू आता माझा विचार करु शकतो’. यावर घन:श्याम त्यांना असं म्हणतो की, “थोडा विचार करु शकतो, जास्त नाही. तीन किंवा चार स्पर्धक आले तर नाही”. यावर डीपी पुन्हा त्याला असं म्हणतात की, “या आठवड्यात कॅप्टन्सी किती महत्त्वाची आहे हे तुला माहीत आहे”.

आणखी वाचा – 06 September Horoscope : कन्या राशीच्या लोकांना शुक्रवारी मिळणार खुशखबर, तर धनु राशीच्या लोकांना मिळणार शुभ संकेत, जाणून घ्या…

कॅप्टन्सी कार्यात दिलेला शब्द न पाळल्याबद्दल डीपी घन:श्यामळा विचारतात. तेव्हा घन:श्याम डीपीला म्हणतो की, त्याने त्याला कोणताही शब्द दिला नव्हता, त्याने फक्त प्रयत्न करेन असे म्हटले होते. यामुळे दोघांमध्ये काही काळ बाचाबाची होते. मात्र नंतर डीपी माघार घेतात. अशातच टास्कदरम्यान, डीपी वैभवला ग्रुपमध्ये मी माझ्याबद्दल काहीही बोललो नाही” असंही म्हटलेले असतात. त्यामुळे डीपी यांना त्यांच्याच ग्रुपमध्ये एकटे पडले असल्याचे जाणवत आहे आणि ही गोष्ट ते अंकिताकडे व्यक्त करतात.   

Tags: bigg boss marathi 5DP aka Dhananjay Powarghanshyam darawade
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Abhijeet Kelkar On Bigg Boss Marathi

"त्याला कोणीच Unfair वाटत नाही", अभिजीत केळकर 'बिग बॉस मराठी'वरच भडकला, म्हणाला, "स्वत:चाच इतिहास विसरलाय आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.