रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi चा चौथा कॅप्टन बनला गोलीगत सूरज चव्हाण, सलग तीन आठवडे नॉमिनेटेड असूनही मिळवले कॅप्टन पद

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 6, 2024 | 9:21 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 new captain suraj chavan promo is out see the details

Bigg Boss Marathi च्या घरचा नवीन कॅप्टन बनला सूरज चव्हाण, सहस्पर्धकांनी केलं कौतुक

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’च्या घरात कॅप्टन्सीला खूपच महत्त्व आहे. कारण कॅप्टन बनल्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर जायच्या नॉमिनेशनमधून सुरक्षा मिळते. तसंच या घरातील काही विशेषाधिकारही मिळतात. त्यामुळे या घरात आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी कॅप्टन्सीचा टास्क हा प्रत्येक स्पर्धकांकडून चांगला खेळला जातो. अशातच या घराला आता एक दिलदार व्यक्तीमत्व कॅप्टन म्हणून मिळणार आहे आणि हे व्यक्तीमत्व म्हणजे गोलीगत सूरज चव्हाण. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गोलीगत किंग सूरज चव्हाण नवीन कॅप्टन बनला आहे. नुकताच तो कॅप्टन झाल्याचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. (Bigg Boss Marathi New Captain)

‘बिग बॉस मराठी’च्या नवीन प्रोमो आऊट झाला असून यामध्ये कॅप्टन्सी कार्याची झलक पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की, ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील नवीन कॅप्टन होण्याचा मान सूरज चव्हाणला मिळाला आहे. कॅप्टन्सी कार्यात सूरज चव्हाणने झापुक झुपूक गेम करत बाजी मारली आणि तो आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील नवीन कॅप्टन झाला आहे. यानंतर घरातील सदस्यांनी त्याचं अभिनंदन करत कौतुक केल्याचंही दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – 06 September Horoscope : कन्या राशीच्या लोकांना शुक्रवारी मिळणार खुशखबर, तर धनु राशीच्या लोकांना मिळणार शुभ संकेत, जाणून घ्या…

सूरजच्या या नवीन प्रोमोसह असं म्हटलं गेलं आहे की, “झापूक झूपूकचे ब्रँड अँम्बेसेडर, गोलिगत आहे ज्यांचं जिगर, सर्वात आवडते पब्लिक फिगर असे सूरजभाऊ चव्हाण झाले आहेत कॅप्टन”. सूरजच्या या कॅप्टन्सीचा सर्वांनाच आनंद झाला आहे. त्यामुळे घरातील सदस्य “हमारा कॅप्टन कैसा हो, सूरज भाऊ जैसा हो”, अशा घोषणा देताना दिसत आहे. तसंच त्याचं अभिनंदन करत असल्याचेदेखील या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “आत्महत्येचा विचार येईल तेव्हा सूरज चव्हाणला आठवा”, किर्तनकाराचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले, “आई गेली तेव्हा…”

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या गुरुवारच्या भागात पार पडलेल्या कॅप्टन्सी कार्यात एकूण चार सदस्य हे कॅप्टन्सी पदाचे दावेदार होते. यात वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे चार स्पर्धक होते. अशातच आता सूरज या घरचा नवीन कॅप्टन बनला आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या या नवीन प्रोमोवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट्सद्वारे कौतुक केलं आहे.

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 new captainSuraj ChavanSuraj Chavan New Captain
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Paaru Serial Update todays episode

Paaru Marathi Serial : प्रियाच्या वडिलांचं मन जिंकण्यात पारू-आदित्य यशस्वी, अहिल्यादेवींचीही भेट घडवून आणणार अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.