मंडळी हरिवंश राय बच्चन यांच्या ‘लहरो से डरकर नैय्या पार नहीं होती, कोशिश करने वालो कि कभी हार नहीं होती’ या ओळी एखाद्याला प्रोत्साहित करायला कारणीभूत ठरू शकतात. करिअरच्या विविध टप्प्यांवर अनेकांना वेगवेगळे अनुभव येत असतात काही जण त्या अनुभवामुळे खचून जातात तर काही जण त्यातून प्रेरित होऊन पुढील आयुष्यात यश मिळवतात.(Struggle Story Gaurav More)
सुरूवातीच्या काळात झालेला असाच स्ट्रगल आणि त्यातून न खचता पुढे आलेला एक अभिनेता आपल्या मराठी मनोरंजन विश्वात आहे. तो म्हणजे आपल्या भन्नाट विनोदीशैली ने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता गौरव मोरे. कॉलेज मध्ये असताना गौरव सोबत घडलेला एक किस्सा त्याने नुकताच शेअर केला आहे ज्या घटनेमुळे तो आयुष्यात कधी हि मागे फिरला नाही. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे गौरवची स्ट्रगल स्टोरी.

महाराष्ट्राची हास्य जत्रा या तुफान विनोदी कार्यकमातून आज घरोघरी पोहचलेला, फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून प्रसिद्ध असलेला गौरव मोरे माहित ने नसलेले खूप कमी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील. हास्यजत्रेत अनेक स्किट्स गाजवणाऱ्या गौरवला कॉलेज मध्ये असताना एका ऐकांकिकेतून अचानक काढून टाकलं गेलं होत. महिनाभर त्या ऐकांकिकेची रिहर्सल करून कोणतीही कल्पना न देता अचानक गौरवला काढून टाकण्यात आलं होत.
हे देखील वाचा – आणि सेटवर मामांनी किंग खानला दिले होते अभिनयाचे धडे…
या बद्दल पुढे सांगताना गौरव म्हणाला त्या एका घटनेपासून त्याने ठरवलं कि या पुढे असं काम करायचं कि कधी कोणी आपल्याला हलक्यात घेणार नाही. आणि त्या घटनेतून स्वतःला प्रेरित करत आज गौरवने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.(Struggle Story Gaurav More)
विनोदाची वेगळी शैली आणि अचूक टायमिंग या गोष्टींमुळे गौरव प्रसिद्ध झाला. एकांकिकेतून बाहेर काढणं ते आज स्वतःचा वेगळं अस्तित्व निर्माण करणं अभिनेता गौरवचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणार ठरेल एवढं नक्की.