शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : सूरज चव्हाणने घातलं ‘झापूक झुपूक’ लिहिलेलं खास डिझाइनर शर्ट, रिलस्टार करत आहेत त्याचीच कॉपी, महाराष्ट्राला वेड लावलं अन्…

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 3, 2024 | 12:22 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Riteish Deshmukh praised Suraj Chavan shirt and dialogue and also showed many reels and memes of him.

Bigg boss marathi 5 च्या घरात सूरज चव्हाणच्या शर्टाची व डायलॉगची तारीफ, व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा सीझन फारच लक्षवेधी ठरताना दिसत आहे. यंदाच्या सीझनमधील सदस्यांचा चांगलाच बोलबाला आहे. घरातील सदस्यांना ‘बिग बॉस’च्या प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळताना दिसत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करताना दिसत आहेत. अशातच शनिवार व रविवारच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर प्रेक्षकांना डान्सचा तडका पाहायला मिळाला. ‘बिग बॉस मराठी’च्या सदस्यांनी घरामध्ये एकापेक्षा एक लयभारी डान्स परफॉर्मन्स करताना पाहायला मिळाले. यावेळी गोलीगत सूरज चव्हाणही वेगळी स्टाईल प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सूरज चव्हाण झापुक झुपूक स्टाईलने डान्स करताना दिसला. यावेळी त्यावा जान्हवी किल्लेकरचीही साथ मिळाली. सूरज व जान्हवी या जोडीने ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर डान्स करताना दिसले. (Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan)

यावेळी भाऊचा धक्क्यावर रितेश देशमुखने सूरज चव्हाणच्या डान्ससह शर्टचेदेखील कौतुक केलं. ‘बिग बॉस’मध्ये सूरजला खास शर्ट दिलं गेलं. यावर भाऊचा धक्का, झापूक झुपुक, एसक्यु, आरक्यु, झेड क्यु अशा त्याच्या लोकप्रिय डायलॉगचा समावेश होता. तसंच ‘गोलीगत धोका’ असा डायलॉगही त्यावर लिहिलेला पाहायला मिळालं. तसंच त्याच्या शर्टवर अनेक तुटलेल्या हृदयाचे डिझाईन होते. याबद्दल रितेशने त्याला असं विचारलं की, “यावर तुटलेले हृदय आहेत. तर हे तुटलेले हृदय तुमचे आहेत की तुम्ही तोडलेले आहेत. यावर सूरज त्याच्या शैलीत असं म्हणतो की, “मला फक्त एकच गोलीगत धोका मिळाला आहे”. यावर घरातील सर्वजण हसायला लागतात. पुढे घरातील सर्व स्पर्धकांना त्यांच्या नावाने सोशल मीडियावरील व्हायरल रील्सही दाखवण्यात आले.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – हनी सिंहने स्वतःच्याच गाण्यांना ठरवलं फालतू, ‘ब्लू है पानी पानी’, ‘लुंगी डान्स’ला अर्थच नाही बोलला, म्हणाला, “रात्रभर पार्टी…”

यावेळी सूरजलादेखील त्याचे व्हायरल रील दाखवले गेले. निक्की व सूरज यांनी एकमेकांशी मागच्या भागात त्याच्या ब्रेकअपबद्दल चर्चा केली होती. यावेळी निक्कीने सूरजला “तुला प्रेमात धोका मिळालाय?” असं म्हटलं होतं. त्यावर सूरजने असं म्हटलं होतं की, “माझ्याबरोबर चांगली राहायची, बोलायची. पण तिला दुसरा चांगला मुलगा आवडला गोरापान, तर लगेच गेली मला सोडून. गुलिगत धोका दिला मला”.   

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “त्याला तुझी जास्त गरज आहे”, अभिजीतची बाजू घेत निक्कीचं अंकिताकडे स्पष्टीकरण, म्हणाली, “डोळ्यांत अश्रू…”

निक्की व सूरज यांचा हा संवाद सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता आणि यावर अनेक रील्सही बनले. याच रील्स स्पर्धकांना दाखवण्यात आले. यावर घरातील स्पर्धकही पोट धरून हसले. दरम्यान,  ‘बिग बॉस मराठी’चा रविवारचा भाऊचा धक्का चांगलाच गाजला. रितेशने सर्वांची शाळा घेतलीच पण त्यानंतर त्याने सर्वांशी आगळे-वेगळे टास्क खेळत मजामस्तीही केली. निक्की-अरबाजमध्ये पुन्हा एकदा पॅचअप झालं आणि दुसरीकडे त्यांच्या गेमबद्दलही चर्चा रंगली.

Tags: bigg boss marathi 5riteish deshmukhRiteish Deshmukh praised Suraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 new promo Nikki Tamboli broke all the rules on the house and argument with Varsha Usgaonkar.

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा एकदा निक्कीची मनमानी, सर्व नियम मोडले अन्…; शिक्षा होणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.