शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Saatvya Mulichi Saatvi Mulgi : विरोचकाकडून देवी आईची लेक इंद्राणीचा वध होणार?, अद्वैतलाही त्रास दिला अन्…; ट्वीस्ट पाहून प्रेक्षकही भडकले

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 30, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saatvya Mulichi Saatvi Mulgi serial update new twist that Shatgriva will kill Indrani.

Saatvya Mulichi Saatvi Mulgi मालिकेत शतग्रीव करणार इंद्राणीची हत्या, मालिकेला मोठा ट्विस्ट

Saatvya Mulichi Saatvi Mulgi : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. अलीकडेच मालिकेत विरोचकाचा वध करण्यात आला. पण विरोचकाच्या वधाचा बदला घेण्यासाठी शतग्रीव नावाच्या असूराची एण्ट्री झाली आहे. डॉ. मैथिली सेनगुप्तामध्ये शतग्रीव असूराने प्रवेश केला असून हा असूर आता नेत्रापर्यंत पोहोचला आहे. नेत्राच्या घरातही या असूराने प्रवेश केला आहे. शतग्रीवने नेत्रा आणि तिच्या कुटुंबीयांना फसवून त्यांच्या घरात प्रवेश केला आहे. त्यामुळे या मालिकेला नवीन वळण आलं आहे. (Saatvya Mulichi Saatvi Mulgi Serial Update)

अशातच आता हा शतग्रीव त्रिनयना देवीची लेक इंद्राणीची हत्या करणार असल्याचा नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नवीन ट्विस्टचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यातून इंद्राणीची हत्या होणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. या नवीन प्रोमोमध्ये इंद्राणी नेत्रालं फोन करुन असं म्हणते की, विरोचकाचा वध झाला आहे. पण त्यापेक्षाही मोठं संकट आपल्यावर आलं आहे”. तर शतग्रीव असं म्हणतो की, “आता शतग्रीवसमोर दोन आव्हाने आहेत, एक म्हणजे रीमारूपी अकंपणाचा ताबा मिळवणे आणि दूसरं म्हणजे त्रिनयनाची लेक इंद्राणी हिची हत्या करणे” .

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा –  Video : प्रथमेश लघाटेने गवळण गाताच भर कार्यक्रमात उठून नाचू लागल्या आजी, ‘ते’ दृश्य पाहून बायकोही भारावली

त्यामुळे आता शतग्रीव इंद्राणीची हत्या करणार की त्रिनयना देवी आपल्या लेकीला शतग्रीव असूरापासून वाचवणार हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसंच शतग्रीव असूराने नेत्राच्या घरी प्रवेश केला असून तिच्यामुळे राजाध्यक्ष कुटुंबीयांनाही काही धोका नाही ना? हेदेखील लवकरच पाहायला मिळणार आहे. विरोचकाचा वध झाल्यानंतर एक साधी सरळ स्वभावाची मैथीली सेनगुप्ता शतग्रीव बनते आणि तिच्या सासूचा खून करत महाराष्ट्रच्या दिशेने निघते आणि तिने आता राजाध्यक्षांच्या घरात प्रवेशही केला आहे. या नवीन ट्विस्टवर काही प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. बंद करा मालिका, डबल रोल दाखवून मालिका वाढवत आहेत” अशा कमेंट्स करत यावर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली आहे.

आणखी वाचा –  Navri Mile Hitlerla : एजे लीलाच्या प्रेमात, आजारी असताना रात्रभर उशाशी बसला अन्…; नातं फुलणार

त्यामुळे मैथिली सेनगुप्ता आणि नेत्राच्या नशिबात नेमकं काय लिहिलंय? ती नेत्राच्या बाळाला घेऊन जाणार आहे का? शतग्रीवच्या येण्याने पुन्हा राजाध्यक्षांवर काही नवीन संकट येणार का? आणि त्यामुळे आता नेत्रा विरोचकानंतर शतग्रीवचा सामना कसा करणार? हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.

Tags: marathi serialMarathi Serial Newssaatvya mulichi saatvi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
31 august 2024 Saturday daily horoscope marathi news bhavishyavani astrology 12 zodiac sign know more

31 August Horoscope : कर्क, तूळ, धनु राशीच्या लोकांना शनिवारी मिळणार शुभवार्ता, बाकीच्या लोकांसाठी दिवस कसा?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.