Bigg Boss Marathi 5 : महाराष्ट्राचा लाडका गायक व ‘इंडियन आयडॉल १’ चा विजेता गायक अभिजीत सावंत सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धुमाकूळ घालत आहे. अभिजीतने त्याच्या सुमधुर गायनाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. ‘मोहब्बते लुटाऊंगा…’ या गाण्याने त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वाचा मानकरी अभिजीत होता. त्यावेळी अभिजीत तर तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला होता असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. रातोरात स्टार झालेला हा गायक सध्या ‘बिग बॉस मराठी’ या रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांची मन जिंकत आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात दोन टीम पडलेल्या दिसत आहेत. टीम ए मध्ये निक्की, अरबाज,जान्हवी, वैभव, घनःश्याम हे स्पर्धक पाहायला मिळत आहेत. तर टीम बीमध्ये अभिजीत, अंकिता, पॅडी, धनंजय, सूरज, आर्या हे स्पर्धक पाहायला मिळाले. मात्र भाऊचा धक्का झाल्यानंतर स्पर्धकांच्या या टीम काहीशा कोलमडलेल्या दिसल्या. मात्र ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिजीत पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची मन जिंकताना दिसत आहे.

टीम बीचा कॅप्टन म्हणून अभिजीतकडे पाहिलं जातं. मात्र अभिजीत व निक्कीच्या मैत्रीमुळे टीम बी मधील सदस्य त्याला त्यांच्या टीमचा भाग समजत नाही. यावरुन रितेश देशमुखनेही अभिजीतला सावध केलं. असं असलं तरी अभिजीतहा स्वतःला टीम बीचा सदस्य मानतो. आणि तो त्याच्या टीम साठी खेळताना दिसतोय. मात्र नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये अभिजीतच्या पायाला दुखापत झाली असताना त्याने टीम साठी पातळ लोकमध्ये जाऊन नाणी शोधून आणण्याचा निर्णय घेतला. कारण, पातळ लोकमध्ये जायला त्याची पार्टनर निक्कीने नकार दिला.
अभिजीतचा हा निर्णय आणि खेळ पाहून सर्वत्र त्याच कौतुक होताना पाहायला मिळत आहे. अभिजीतच्या खेळाचं आता त्याच्या बायकोनेही कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे. अभिजीतच्या बायकोने त्याचा खेळ पाहून इन्स्टाग्रामला स्टोरी पोस्ट केलेली पाहायला मिळत आहे. “मला तुझा अभिमान आहे. तुला खेळायला कोणत्याही ग्रुपची आवश्यकता नाही. याउलट त्यांना तुझी गरज आहे. माझ्या भक्कम माणसा”, असं म्हणत अभिजीतची पत्नी शिल्पा सावंत हिने नवऱ्याचं कौतुक करत त्याला पाठिंबा दर्शवला आहे.