शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : निक्की तांबोळीच्या बाईईई… ची पुणेकरांमध्ये क्रेझ, दहीहंडीमध्ये गाणं वाजतात बेभान होऊन नाचले लोक, व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 29, 2024 | 12:57 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 nikki tamboli viral video

निक्की तांबोळीची भलतीच क्रेझ, बाईईई वर थिरकले पुणेकर

Bigg Boss Marathi 5 :  ‘बिग बॉस मराठी’चं यंदाचं पर्व सध्या विशेष गाजताना दिसत आहे. हे चर्चेत असलेलं नवं पर्व गेल्या महिनाभरापासून चर्चेत आलं आहे. यंदाच्या या पर्वात एका सदस्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. हा स्पर्धक म्हणजे निक्की तांबोळी. हिंदी ‘बिग बॉस’मधून आलेल्या या स्पर्धकाने अगदी पहिल्या दिवसापासून ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राडा घालायला सुरुवात केली. अगदी पहिल्या आठवड्यापासून निक्कीची चर्चा सुरु आहे. वर्षा उसगांवकरांबरोबरचं भांडण, अरबाज पटेलची लव्हस्टोरी, टीम ए बरोबर झालेलं भांडण यामुळे निक्की चांगलीच चर्चेत राहिली.

‘बिग बॉस मराठी’मध्ये निक्कीची एक खास स्टाइलही चर्चेत आली. ‘बाईssss हा काय प्रकार आहे?’ हा डायलॉग तिच्या भांडणाबरोबरच चांगलाच गाजतोय. तिच्या या डायलॉगची क्रेझ प्रेक्षकांमध्येही आहे. कारण तिच्या त्या डायलॉगवर आता चक्क पुणेकर थिरकले असल्याचं पाहायला मिळालं. स्पर्धकांशी बोलताना निक्कीने तिच्या खास शैलीत ‘बाईSSS’ हा शब्द उच्चारला होता. बाईSSS’, ‘बाईSSS हा काय प्रकार’ हे निक्कीचे डायलॉग आता सोशल मीडियावरही हिट झाले आहे. त्यानंतर तिच्या या शब्दावर अनेक मीम बनले.

आणखी वाचा – देवोलीना भट्टाचार्जीने फ्लॉन्ट केलं बेबी बंप, आता दिसत आहे अशी, नेटकरी म्हणाले, “तू खूप…”

पुण्याच्या दहीहंडीत
निक्कीच्या “बाईSsss”
डायलॉगवर पुणेकरांचे ठुमके…#Nikkitamboli #BiggBossMarathi pic.twitter.com/rPeVnZt5C3

— Vinit Vaidya (@hifrom_vinit) August 28, 2024

बिग बॉस प्रेमींमध्ये निक्कीचं हे वाक्य चांगलंच व्हायरल झालं आणि याचीच प्रचिती अलीकडेच पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात पाहायला मिळाली. सर्वत्र दहीहंडी उत्सव अगदी दणक्यात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी डीजेवर गोविंदा पथकं थिरकताना पाहायला मिळाली. डीजेवर मराठी गाणं वाजत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : या आठवड्यात वर्षा उसगांवकर घराबाहेर पडणार?, निक्की व अभिजीतनेच केला शिक्कामोर्तब, म्हणाले, “काहीच करत नाहीत आणि…”

‘बिलनशी नागीन निघाली’चं रिमिक्स व्हर्जन ऐकू येत असतानाचं प्रत्येक ओळीनंतर निक्कीच्या ‘बाईssss’चं रीमिक्स करण्यात ऐकायला मिळालं. चाहत्यांचा हा धमाल करतानाच व्हिडीओ निक्कीच्या काही फॅन पेजवरुनदेखील शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ निक्की तांबोळीला टॅग करत इन्स्टाग्रामवर शेअर केला. निक्कीची ही हवा सगळीकडेच पाहायला मिळत आहे. सध्या टीम ए व अरबाजबरोबरच्या तुटलेल्या नात्यामुळे निक्की चर्चेत आली आहे. आजच्या भागात तर अरबाज व निक्की दोघेही रडताना दिसले.

Tags: bigg boss marathibigg boss marathi 5nikki tamboli famous dialogue
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
sarita on domestic violence

गरोदरपणात लाथेने तुडवलं, लैंगिक शोषण, बाहेर अफेअर्स अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे नवऱ्यावर धक्कादायक आरोप, घटस्फोट घेतल्यानंतर…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.