Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं घर म्हटलं की वाद हे आलेच. मात्र भांडणाशिवाय स्पर्धक मंडळी गमती, जमती, गॉसिप, मस्ती करताना दिसत असतात. ‘बिग बॉस’च्या घरात रील स्टार, अभिनेते, अभिनेत्री, गायक, रॅपर अशा विविध क्षेत्रातील कलाकार मंडळींना पाहणं रंजक ठरतंय. ‘बिग बॉस’च्या घरात सध्या सूरज चव्हाण धुमाकूळ घालताना दिसत आहे. पहिल्या आठवड्यात गेम काय असतो हे समजून घेणाऱ्या सूरजने दुसऱ्या आठवड्यात गेम दाखवला आणि अनेकांच्या मनावर राज्य केलं. सूरज सध्या विशेष चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. एका छोट्याश्या खेडेगावातून झगमगाटीच्या दुनियेत सूरजने प्रवेश करत साऱ्यांची मन जिंकली.
सोशल मीडियावर सूरजला प्रेक्षकांचा,चाहत्यांच्या भरपूर पाठिंबा मिळत आहे. इतकंच नव्हे तर कलाकार मंडळीही सूरजला पाठिंबा देत त्याच कौतुक करताना दिसत आहेत. सूरज आता स्पर्धकांमध्ये, ‘बिग बॉस’च्या घरामध्ये रमला असून तो सुद्धा आता त्याचा खेळ खेळताना दिसत आहे. ‘बिग बॉस’ यांनी जोड्या करुन दिल्या आहेत. या नव्या टास्कमध्ये सूरज व जान्हवीची जोडी पाहायला मिळत आहे. तर वर्षा ताई व अंकिताची जोडी पाहायला मिळत आहे.
अशातच ‘बिग बॉस’च्या घरातील एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, वर्षा ताई व अंकिता यांना सूरज सासू सून म्हणून चिडवताना दिसत आहे. ‘बिग बॉस’ यांनी मुद्दाम वर्षा ताई व अंकिता यांची जोडी जमवली आहे. कारण अंकिताने वर्षा ताईंसारखी सासू नको असं भाष्य केलं होतं. त्यामुळे मुद्दाम ही जोडी एकत्र आणली आहे. अशातच सासू सूनेच्या या जोडीची सूरज फिरकी घेताना दिसत आहे. प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, “आई वहिनीला समजावा”, असं गमतीत वर्षा ताईंना बोलताना दिसत आहे.
आणखी वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळताच कलाकारांचा संताप, रितेश देशमुख म्हणाला, “राजे आम्हाला…”
यावर अंकिता सूरजला बोलते, “ओ भावोजी. गप्प बसा. तुम्ही तुमची ड्युटी सांभाळा”. यावर सूरज म्हणतो, “तुम्हीच तुमची ड्युटी सांभाळा”. तेव्हा अंकिता म्हणते, “आम्ही आमची ड्युटी सांभाळत आहे. लावलं की नाही सासूबाईंना कामाला”. यावर वर्षा ताई मागून म्हणतात, “मीसुद्धा आता सूनेला कामाला लावणार आहे”. यावर अंकिता म्हणते, “मी करणारच नाही. माझी मर्जी. माझं घर”, असं बोलताच सूरज तिला म्हणतो, “माझी मर्जी वगैरे इथे नाही. सासूचं ऐकायला लागणार”.