शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “कोणत्या थराला जाऊन बोलतोय याचं तरी भान ठेवा”, जान्हवी-पॅडीच्या वादावर योगिताच्या नवऱ्याचं भाष्य, म्हणाला, “हसून सॉरी म्हणत…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 21, 2024 | 6:10 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily update Saorabh Chaughule shared an angry post on Janhavi Killekar insulted Paddy aka Pandharinath Kamble

Bigg Boss Marathi 5 मध्ये जान्हवी किल्लेकरकडून पॅडी कांबळे यांचा अपमान होताच सौरभ चौघुले भडकला, पोस्टद्वारे व्यक्त केला संताप

Bigg Boss Marathi 5 : सध्या टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त चर्चेतला शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’चा पाचवे पर्व. या कलाकारांचे आपपसात होणार वाद, घरातील काम, गॉसिप्स यामुळे यंदाचे पर्व खूपच चर्चेत आहेत. नुकतंच बिग बॉसच्या घरात एक टास्क रंगला. या टास्कवेळी जान्हवी किल्लेकर आणि पंढरीनाथ (पॅडी) कांबळे यांच्यात मोठा वाद झाला. “पॅडी दादा आयुष्यभर अशी ओव्हर अ‍ॅक्टिंग करून थकले आहेत”, असे वक्तव्य जान्हवीने केले. जान्हवीने केलेले हे वक्तव्य घरातील सदस्यांना अजिबात आवडले नाही. त्यांनी यावरुन जान्हवीला विरोध केला. आता जान्हवीच्या या वक्तव्यावरुन सिनेसृष्टीतील कलाकार संताप व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही मंडळी पॅडी यांना पाठिंबा देत जान्हवीवर टीका करत आहेत. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)

जान्हवीने पॅडी यांच्या करिअरबद्दल केलेल्या वक्तव्यावर मराठी सिनेसृष्टीकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. जान्हवीने पॅडी यांचा अपमान कर्त्यंची अभिनेत्री विशाखा सुभेदार, अभिजीत केळकर, सिद्धार्थ जाधव, सुशील इनामदार, सुरेखा कुडची आदी कलाकारांनी पॅडी यांच्या अपमानावर भाष्य केलं आहे. तसंच चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरांनी पंढरीनाथ कांबळेची बाजू घेत जान्हवी किल्लेकरवर टीकास्र सोडलं आहे अशातच या पर्वातील माजी स्पर्धक योगिता चव्हाणचा नवरा म्हणजेच अभिनेता सौरभ चौघुलेनेदेखील या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुझी लायकी काय?, झक मारुन…”, जान्हवीने पॅडीचा अपमान केल्यानंतर मराठी अभिनेत्रीने कठोर शब्दांत सुनावलं, म्हणाली, “तुझं तोंडच…”

सौरभने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे असं म्हटलं आहे कि, “आपण काय बोलतोय? कोणाला कितपत आणि कोणत्या थराला जाऊन बोलतोय आणि “कोणाला” बोलतोय याचं तरी भान असावं. आता पुन्हा शनिवारी खाली मान घालून गालातल्या गालात हसून सॉरी म्हणून मोकळं व्हायचं. इतकंच काय ते होणार का?” असं म्हटलं आहे. ‘बिग बॉस’च्या मंगळवारच्या भागामध्ये जान्हवीने टास्कदरम्यान पॅडी यांचा अभिनयावरून अपमान केला. जान्हवी म्हणाली, “सगळे घाणेरडे आहेत. यांच्यात दम नाहीये समोर येऊन बोलायला. पॅडी दादाच्या तर काहीतरी अंगातच घुसलंय. आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग करून दमले. आता ती ओव्हर अ‍ॅक्टिंग घरात दाखवतायत”

आणखी वाचा – Badlapur School Sexual Abuse Case : “चौकात लिंग कापून…”, बदलापूर प्रकरणी कलाकारांचं सरकारडे साकडं, म्हणाले, “यांना दगडाने ठेचून…”

जान्हवीने पंढरीनाथ कांबळे यांचा केलेला हा अपमान ऐकून आर्या तिला जाब विचारायला गेली. तेव्हादेखील जान्हवी म्हणाली, “मी फालतू माणसांना रिप्लाय देत नाही” अभिनेत्रीच्या या वर्तुणकीचा निषेध आता मराठी कलाकार मंडळी करत आहेत. पंढरीनाथचा अपमान केल्यामुळे तिच्यावर चहूबाजूने टीका होत आहेत. अनेक नेटकरीदेखील सोशल मीडियावर कमेंट्सद्वारे त्यांचा राग व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता भाऊचा धक्कामध्ये रितेश जान्हवीला काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags: bigg boss marathi 5janhavi killekarPandharinath KambleSaorabh Chaughule
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
dhananjay powar in bigg boss marathi

"आम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री द्या", डीपीच्या बायको व आईचं Bigg Boss Marathi वर भाष्य, म्हणाल्या, "कोल्हापुरी ठसका दाखवूनच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.