आई कुठे काय करते ही मालिका आज सर्वत्र पाहिली जाते. मालिकेत विविध अंग पाहून प्रेक्षक नेहमी आश्यर्यचकित होतात.ही कथा ज्या अरुंधती या पात्रा भोवती फिरते त्या पात्राच्या आयुष्यात अनेक अडचणी येताना पाहायला मिळतात तरीही धैर्याने सामोरं जाऊन त्या अडचणींना अरुंधती उत्तर देते. एका लग्नानंतर पतीच्या विनाकारण त्राग्या ने वैतागून दुसरं लग्न अरुंधतीने केलं. आशुतोष सोबत दुसरं लग्न नंतर केल्यानंतर देशमुख कुटुंबातुन अरुंधती दुसऱ्या घरी राहायला गेली पण कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे देशमुखांशी जोडली जाते.(New Entry in Aai kuthe kay karte)

आई कुठे काय करते या मालिकेत सध्या इशाच्या साखरपुड्याचा घाट घालण्यात आला आहे. अनिरुद्धच्या विरोधानंतर ही ईशा तिच्या हट्टाला पेटली नंतर अनिरुद्धच्या ही मान्यते नंतर ईशा आणि अनिश च्या लग्नाला मान्यता देण्यात आली. परंतु ईशाच्या साखरपुड्या सोबतच मालिकेत एक नवीन वळण पाहायला मिळतंय. आई कुठे काय करते या मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडेची एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळतंय. अनिरुद्धची नवीन बिझनेस पार्टनर तर आशुतोषची बहीण हे पात्र अभिनेत्री खुशबू तावडे साकारणार आहे.

यापूर्वी अनेक हिंदी मालिकांमधून तसेच आम्ही दोघी या लोकप्रिय मालिकेतून खुशबू ने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तर आता आई कुठे काय करते मालिकेत खुशबूची एन्ट्री काय नवीन रंजक वळण आणणार ये पाहून उत्सुकतेचं ठरणार आहे.(New Entry in Aai kuthe kay karte)