महेश कोठारे आणि दिग्दर्शन हे समीकरणच म्हणायला हवं. सिनेमा दिग्दर्शित करणाऱ्या हाताशी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांना अगदी चोख लागत. बरेचदा तर ते दिग्दर्शनावेळी कलाकारांनाही सोडत नसत. असाच महेश कोठारे यांनी एक किस्सा त्यांच्या डॅम इट आणि बरच काही या पुस्तकात सांगितला आहे. सगळ्यांची लाडकी आणि सिनेअभिनेत्री अश्विनी भावे हीच हा किस्सा आहे. एका चित्रपटासाठी महेश यांची नायिका म्हणून अश्विनी काम करत होती. तर महेश या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील करत होते.(Mahesh Kothare Ashvini Bhave)
चित्रपटातील एका प्रसंगाच्या चित्रीकरणासाठी काही काळाचा अवधी लागणार होता, कारण काही कारणामुळे तयारी लांबली होती. दरम्यान अश्विनी या सेटवर येऊन तयार होऊन आधीच बसल्या होत्या. आणि बराच वेळ झाल्याने त्यांचा कॉस्च्युम ही चुरगळाला होता. त्यामुळे इस्त्री करण्यासाठी त्या रूममध्ये गेल्या होत्या. त्यावेळचा हा किस्सा महेश यांनी सांगितला आहे.
पहा काय म्हणाले होते महेश कोठारे (Mahesh Kothare Ashvini Bhave)
याबाबत सांगताना महेश म्हणाले, ‘शॉट रेडी आहे आणि ड्रेस चुरगाळण्यासारख्या फुटकळ कारणासाठी आपल्याला थांबावं लागतंय, ही गोष्ट काही माझ्या मनाला पटेना. नाराजीची जागा आता रागानं घेतली होती. “अश्विनी, तू आता पाच मिनिटांमध्ये आली नाहीस तर मी आजच्या दिवसासाठी पॅकअप करतोय! मग तू घरी जाऊ शकतेस!” असा निरोप मी तिला पाठवला. तो ऐकून अर्थात अश्विनी तिसऱ्या मिनिटाला सेटवर आली !'(Mahesh Kothare Ashvini Bhave)
आणि येऊन ती महेश यांनी म्हणाली, “काय हे महेश, ही माझी पँट तरी बघ जरा, किती चुरगळली आहे. पण तेव्हा मी तिचं काहीच ऐकून घेण्याच्या मनःस्थितीमध्ये नव्हतो. “अश्विनी, तू काहीच काळजी करू नकोस. कारण तुझी चुरगळलेली पँट प्रत्यक्ष पडद्यावर दिसणार नाही, याची खात्री मी तुला देतो. चित्रपट सिनेमास्कोप असल्यामुळे तुझ्या पॅटचा फक्त वरचाच भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे!”
आजही जेव्हा केव्हा ‘धडाकेबाज’ बघतो तेव्हा अश्विनी यांची पँट चुरगळलेली दिसत नाही! यापुढे बोलताना महेश कोठारे म्हणाले, अश्विनीबरोबरचं माझं ‘निने प्रेमिचेनू’ हे गाणं खूप गाजलं होतं. त्या गाण्याचाही एक मजेशीर किस्सा आहे. त्या गाण्यात अश्विनीकडून मला नीट मिठी मारली जात नव्हती. पण आता मी दिग्दर्शक झालो होतो. तीन चांगल्या आणि हिट कलाकृती माझ्या नावावर होत्या. त्यामुळे या वेळी मी बोलायचं ठरवलं. अश्विनीला आधी मी याबद्दल समजावून सांगितलं; पण तरीही मला अपेक्षित असलेला रिझल्ट काही येत नव्हता. तेव्हा आता अश्विनीला स्पष्ट बोलण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय शिल्लक नव्हता.(Mahesh Kothare Ashvini Bhave)

“अश्विनी, तुला हे आता चांगलंच माहिती आहे, की मी ‘क्लीन कॅरेक्टर’चा माणूस आहे. सो. मी सांगतोय तसं कर तू!” माझ्या तोंडून ‘क्लीन कॅरेक्टर’ हा शब्द अश्विनीला चांगलाच लागला असावा. यावर त्या महेश यांना म्हणाल्या, “महेश, असं नाही रे! तू काहीतरीच बोलतो आहेस!”
हे देखील वाचा – सध्या रंगभूमी गाजवणारी ही नाटकं आवर्जून पाहा
मी ‘क्लीन कॅरेक्टर’चा माणूस आहे, हे स्पष्ट शब्दांमध्ये सांगितल्यानंतर अभिनेत्री अश्विनी भावेसोबतचं महेश यांचं गाणं झकास जमून आलं होतं. आपल्याला हवी ती भूमिका वाढवून घेण्यात महेश कोठारे यांचा चांगलाच हातखंडा होता.