अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या दिग्गज अभिनेत्री म्हणून मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत देखील ओळखल्या जातात. राजा शिवछत्रपती किंवा फर्जंद मधील आई जिजाऊ असोत, किंवा अवंतिका असो वा मुलांना मदत करणारी सोनपरी. विविध शेड्स असणाऱ्या भूमिका मृणाल यांनी अगदी सहजरित्या साकारल्या.त्यांनी अभिनेत्री सोबतच उत्तम दिग्दर्शिका म्हणून देखील त्यांची ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनयासोबतच सर्वजण त्यांच्या दिग्दर्शनाचे देखील सर्वजण कौतुक करतात.(mrinal kulkarni)

स्वामी या मालिकेपासून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली, आणि तेव्हा पासून त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही त्यांनतर त्यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. स्वामी नंतर श्रीकांत ही मृणालची पहिली हिंदी मालिका होती. हिंदी मालिकेत काम करण्यासाठी त्यांनी हिंदीचा खूप अभ्यास देखील केला पण त्यांनतर बऱ्याच वर्षांनी त्यांना अवंतिका ही मराठी मालिका मिळालेली. पण या मालिकेच्या सेटवर त्यांची चेष्टा केली जात होती.
हे देखील वाचा : ..म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक राज कपूर यांच्या चित्रपटाला मृणाल कुलकर्णी यांनी दिला होता नकार
अवंतिका ही एका अश्या स्त्री ची कथा आहे जिच्या सुखी संसाराचं स्वप्न एका क्षणात पुसलं जात.अवंतिका ही मालिका जवळपास ४ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. या मालिकेच्या आधी त्यांनी बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये काम केले होतो. म्हणून अवंतिकाचे दिग्दर्शक संजय सूरकर त्यांची चेष्टा करत. ते कधी कधी तू हिंदीतून मराठी बोलतेस” असं म्हणत असतं.तरीही या मालिकेत त्यांनी मुख्य भूमिका इतकी चोख निभावली आहे की, या मालिकेनंतर त्यांना अनेक मराठी मालिकांच्या ऑफर्स यायला लागल्या.(mrinal kulkarni)
मृणाल यांची प्रत्येक भूमिका गाजली आहे. पण अवंतिका या मालिकेतील मुख्य भूमिका ही त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला असं म्हणायला हरकत नाही. कारण या मालिकेनंतर त्यांना अनेक मालिका आणि चित्रपट त्यांना मिळाले.आणि त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेने त्यांची एक वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली.
स्पर्धेच्या जगात मृणाल यांचं काम आजही नावाजलं जातं.त्यांची ऐतिहासिक चित्रपटातील जिजाऊ आऊसाहेब ही भूमिका लक्षवेधी ठरे. तगर मृणाल सध्या सरी या चित्रपटातून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.(mrinal kulkarni)
