कलाकार कितीही मोठा झाला तरी त्याच्याही आयुष्यात ही वादळ येत असतात. मग ती खाजगी आयुष्यातील असो वा व्यावसायिक आयुष्यातील. दरम्यान कुटुंबियांवर ओढावलेल्या संकटांच्या वेळी हा कलाकार आपल्या कुटुंबाच्या पाठीशी ही तितकाच खंबीरपणे उभा राहतो. असं काही नसत की तो कलाकार आहे म्हणून त्याच्या आयुष्यात दुःखच नाहीत, शेवटी तो ही एक माणूस आहे. हे सगळं बोलण्यामागचं कारण म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यन या बॉलिवूडमधील कलाकाराच्या घरावर ओढवलेला प्रसंग.(Kartik Aaryan Emotional)
अभिनेता कार्तिक आर्यन हा आजच्या घडीला आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘भुलभुलैया 2’ या चित्रपटाने कार्तिक आर्यनला एक वेगळी ओळख मिळाली. या त्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. सिनेविश्वात कुणीही गॉडफादर नसताना कार्तिकने स्वमहेनतीवर आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली. नुकतीच कार्तिक आर्यन याने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. कार्तिकनं इन्टाग्रामवरून एक इमोशनल पोस्ट शेअर केली असून सोशल मीडियावर कार्तिकच्या या पोस्टची जोरदार चर्चा आहे.
पहा कार्तिकची भावुक पोस्ट (Kartik Aaryan Emotional)
कार्तिक आर्यन याची आई गेल्या दोन-तीन वर्षांपासून कर्करोगानं ग्रस्त होत्या. आता त्या या आजारातून बऱ्या झाल्या असल्याची खुशखबर आपल्या चाहत्यांना देत कार्तिक आर्यन प्रचंड भावुक झाला आहे. त्याने काल रात्री आपला आणि आपल्या आईचा एक हसरा फोटो शेअर करत भावुक पोस्ट इन्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केली आहे. कार्तिक आर्यनच्या लाखो चाहत्यांनी या पोस्टवर शुभेच्छा देत त्याच्या आईला लवकरात लवकर बरं वाटू दे अशा कमेंट केल्या आहेत. दरम्यान आक्र्टिक आर्यन च्या या पोस्टवर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय कलाकारांनीही कमेंट केली आहे.(Kartik Aaryan Emotional)
हे देखील वाचा – वडिलांच्या निधनाला कुठे होते अशोक सराफ ?
”काही दिवसांपुर्वी मोठा C म्हणजे Cancer हा आपल्या कुटुंबियांच्या आयुष्यात तग धरून होता. यामुळे आम्ही सर्वच खचून गेलो होतो आणि काय करावं हे आम्हालाही कळतं नव्हतं. पण माझ्या आईला याचे श्रेय आहे. तिच्या एवढी ताकदवान, कणखर आणि मजबूत मनाची सेनानी दूसरी कोणीच नाही. त्यामुळे C म्हणजे तिच्या Courage नं आपल्या आयुष्यातील सर्व मळभ दूर केल आहे आणि या सगळ्यावर मात केली. या सगळ्यातूनच आम्ही खूप शिकलो. या जगात आपल्या आईवडिलांच्या पाठिंब्यापेक्ष आणि प्रेमापेक्षा मोठं काहीच नाही.” अशा आशयाची पोस्ट शेअर करत कार्तिक आर्यन भावुक झाला आहे.
