Payal Malik Hospitalized : अरमान मलिक गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. जेव्हा यूट्यूबर ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये गेला. तेव्हा त्याच्यावर बहुपत्नीत्वाचा प्रचार केल्याचा आरोप झाला. मात्र, या तिघांनीही आपण बहुपत्नीत्वाला कोणत्याही प्रकारे प्रोत्साहन देत नसल्याची कबुली दिली आहे. अशातच आता अरमान मलिकची पहिली पत्नी पायलची तब्येत बिघडली असल्याचे वृत्त संमोर येत आहे. तिची तब्येत अचानक बिघडली असल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका मलिकने तिच्या लेटेस्ट व्लॉगमध्ये ही माहिती दिली आहे. (Payal Malik Hospitalized)
कृतिका मलिकने एक व्लॉग शेअर केला आहे, ज्यामध्ये ती सांगत आहे की पायलची तब्येत बिघडली आहे आणि ते तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात आहेत. पायलच्या हृदयाचे ठोके वाढले असून तिचा रक्तदाबही कमी झाल्याचे कृतिका सांगत आहे. कृतिका म्हणाली की, तिला कोणताही धोका पत्करायचा नाही, म्हणून ती त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली.
यानंतर कृतिकाने सांगितले की, रुग्णालयात पोहोचल्यानंतर पायलचा ईसीजी करण्यात आला. तिचे रिपोर्टस चांगले नव्हते. त्यामुळे ती पायलला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तेथे त्यांना हृदयरोग तज्ज्ञांना दाखवण्यात आले. पायलबरोबर हॉस्पिटलमध्ये एक रात्र घालवल्यानंतर कृतिका दुसऱ्या दिवशी सकाळी घरी परतली. दुपारी कृतिका हॉस्पिटलमध्ये गेल्यावर पायल तिला पूर्वीपेक्षा बरे वाटत असल्याचे सांगते. जेव्हा कृतिकाने पायलला तिच्या रक्ताच्या अहवालाबद्दल विचारले तेव्हा पायल तिला सांगते की रिपोर्ट ठीक आहे.
दरम्यान, अशक्तपणामुळे पायलला थंडी वाजत होती. त्यामुळे पायल सांगते की डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज देण्यास सांगितले आहे. मग कृतिका जाते आणि सर्व औपचारिकता पूर्ण करते. परत येताना ती म्हणते, “आमच्या कुटुंबावर कुणाच्या तरी वाईट नजरेचा परिणाम झाला आहे. रोज काही ना काही घडत असते. मुलेही आजारी होती पण ती आता बरी झाली आहेत”.