रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : डीपी व इरीनाचं भांडण, पण उगाचच मध्ये आला वैभव, आरडाओरड आरोप करत वाद वाढवला अन्…; प्रेक्षकही संतापले

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 13, 2024 | 1:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily update in Dhananjay and Irina fight Vaibhav came and he argument

Bigg Boss Marathi 5 च्या घरात धनंजय व इरीनाचं भांडणात वैभवची उडी, उगाच वाद घालत केलं भांडण

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’ आणि ‘बिग बॉस’च्या घरातील भांडणं ही प्रेक्षकांना काही नवीन नाहीत. ‘बिग बॉस’च्या घरात काहीना काही कारणावरुन वाद हे होतच असतात. या घरात दररोज कुणाचं ना कुणाचं तरी भांड्याला भांडलं लागतच आहे. त्यातच पहिल्या आठवड्यात निक्की आणि वर्षा उसगांवकर यांचा राडा झाल्यानंतर रितेशने तिची चांगलीच शाळा घेतली होती. त्यानंतर आता दुसऱ्या आठवड्यात जान्हवी आणि वर्षा उसगांवकर यांच्या राड्याची चर्चा झाली. त्यानंतर जान्हवीने ‘बिग बॉस’चा दूसरा आठवडा गाजवला. अशातच तिसऱ्या आठवड्याची सुरुवातही भांडणांनीच झाली. ‘बिग बॉस’च्या घरात काल निक्कीने तिच्या खाजगी वस्तूंना हात लावला. या कारणावरुन घरात धुमाकूळ घातला.  (Bigg Boss Marathi 5 Daily Update)

‘बिग बॉस मराठी’च्या सोमवारच्या भागात पॅडी म्हणजेच पंढरीनाथ कांबळे यांनी निक्कीच्या कपड्यांच्या कंटेनरला हात लावला. यामुळे आपल्या खाजगी वस्तूंना हात लावल्याच्या रागात निक्कीने घरातील सर्वांच्या वस्तूंची नासधूस केली. यामुळे निक्कीने घरात खूपच कल्ला केला. यामुळे घरातील ज्या ज्या सदस्यांचे सामान निक्कीने फेकले होते. त्या त्या सदस्यांमध्ये खूपच राडा झाला. यावेळी सामनाच्या फेकाफेकीत निक्कीने चुकून इरीनाचेही समान फेकले. यामुळे ती चिडली आणि या चीडचीडमध्ये धनंजयने इरीनाला काहीतरी बोलले असल्याचं तिला वाटतं. त्यामुळे ती रागावून बाहेर येते.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Munawar Faruqui : “कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता पण…”, कोकणी माणसाला शिवी व खिल्ली उडवल्यानंतर मुनव्वर फारुकीची माफी, म्हणाला, “त्यावेळी मला…”

यानंतर इरीना व धनंजय बाहेर येतात आणि घरात झालेल्या भांडणावरुन एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा इरीना त्याला “तू सर्वांसमोर मला खडूस म्हणाला. मला गर्व आहे असं तू म्हणाला” असं म्हणते. यावर धनंजयही तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो. इतक्यात तिथे वैभव येतो आणि त्या दोघांच्या संभाषणात सहभागी होतो. यावेळी वैभव इरीनाला  धनंजयने  तिच्याबद्दल काय म्हटलं आहे हे सांगतो. यावेळी धनंजय व त्याच्यात बाचाबाची होते. तेव्हा वैभव धनंजयला त्याची बोलण्याची पद्धत चुकीची असल्याचे म्हणतो. तेव्हा धनंजयही मी असं काही बोललो असेल तर मी इरीनाची माफी मागायला तयार आहे” असं म्हणतो.

आणखी वाचा – घरी जाण्यासाठी योगिताचा Bigg Boss कडे हट्ट, शोमधील त्रास अभिनेत्रीला सहन होईना, एक्झिट घेणार का?

नंतर वैभव धनंजयला “मला तुझ्याकडून या अपेक्षा नाहीत” असं म्हणतो. मग् धनंजय इरीनाला “माझ्या मनात तुझ्याविषयीच्या भावना या चांगल्याच आहेत” असं म्हणतो. त्याला हे बोलताना पाहून वैभव “आधी चूक करायची आणि नंतर समजूत काढत बसायचं” असं म्हणत तिथून निघून जातो. तसंच ‘बिग बॉस’च्या घरात इरीना व धनंजय यांच्यात चाललेल्या भांडणातही वैभव मध्ये पडला होता.    

Tags: bigg boss marathi 5dhananjay powarIrina RudakovaVaibhav Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 episode nikki insult malvani language

Bigg Boss Marathi च्या घरात मालवणी भाषेचा अपमान?, ही मराठी भाषा नसल्याचं निक्कीकडून जाहीर, अंकिताला डिवचलं

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.