शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : परदेशात भारतीय संस्कृती व परंपरांचे दर्शन, आदेश बांदेकर भारावले, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 31, 2024 | 11:39 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aadesh Bandekar shared a video about hearing Kathak dance tunes in America and that Indian culture is being preserved abroad.

Video : परदेशात भारतीय संस्कृती व परंपरांचे दर्शन, आदेश बांदेकर भारावले, व्हिडीओ व्हायरल

‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय शोमधून “दार उघड बये दार उघड” असं म्हणत अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले अभिनेते, निवेदक म्हणजे आदेश बांदेकर. आदेश बांदेकर हे मनोरंजन क्षेत्रासह राजकारणातही तितकेच सक्रिय आहेत. रंगभूमी, होम मिनिस्टर आणि याशिवाय राजकीय कार्यक्रम यानिमित्ताने आदेश यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी ते प्रवास करत असतात. महाराष्ट्रासह भारतभर आणि भारताबाहेरही ते जात असतात. याच प्रवासादरम्यानचे अनुभव, किस्से, काही खास आठवणी ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक छान व्हिडीओ शेअर केला आहे.

आदेश ‘खेळ मांडियेला’ या कार्यक्रमानिमित्त ते सध्या अमेरिकेला गेले असून तिथे त्यांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले. आदेश यांना परदेशात भारतीय कथ्थक नृत्य प्रकाराचे शिक्षण दिले जात असल्याचे कळले.  त्याचबरोबर हे शिक्षण एक भारतीय मराठी महिला देत असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. प्रत्येक भारतीयासाठी ही एक अभिमानाची व आनंदाची बातमी असून हाच आनंद आदश यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला आहे. आदेश बांदेकर हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. सोशल मीडियाद्वारे ते आपल्या कामानिमित्त काही मजेदार घटना किंवा प्रसंगे शेअर करत असतात. अशातच त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

आणखी वाचा – “पाय वरती करुन झोपता, तुमचा माज अक्कल अन्…”, निक्कीकडून वर्षा उसगांवकरांचा घाणेरड्या शब्दांत अपमान, म्हणाली, “मोठ्या कलाकार असाल घरी…”

या व्हिडीओमध्ये आदेश यांनी असं म्हटलं आहे की, “अमेरीकेत मी वेस्ट ग्रू येथे माझ्या मित्राच्या घरी आलो असून इथे येताच मला भारतीय नृत्य कलाप्रकारचे बोल माझ्या कानावर पडले. इथे राधिका जोशी कथ्थकचे क्लासेस घेतात आणि आपली परंपरा, संस्कृती जपतात. राधिका जोशी अमेरिकेत कथ्थकचे मार्गदर्शन करुन अनेक माऊलींना शिक्षण देतात”. यापुढे त्यांनी राधिका जोशी  यांचे कौतुक केलं आहे. तसेच कानांवर पडणाऱ्या कथ्थकच्या सुरांमुळे कान तृप्त झाल्याची भावनादेखील व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – Video : निक्की तांबोळी व कोकण हार्टेड गर्लमध्ये तुफान राडा, दोघींनीही एकमेकींना ढकललं अन्…; मारामारीचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, या व्हिडीओमध्ये पुढे त्यांनी वेस्ट ग्रू येथील त्या वास्तूची संपूर्ण झलकही दाखवली आहे. अगदी प्रशस्त व भव्य असं हे घर असून राधिका जोशींनीही आदेश यांचे आदरातिथ्य केलेलं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अमेरिकेत  आदेश यांनी त्यांच्या काही मित्रांबरोबर केलेली मजामस्तीही सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. आदेश खास क्षणांना अनेक चाहत्यांनी लाईक्स  व कमेंट्स करत कौतुक केलं आहे.               

Tags: Aadesh BandekarHome Minister Famemarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Aishwarya Narkar On Trolling

"लाली-पावडर लावली नाही तर भयानक ना…", ऐश्वर्या नारकरांना दिसण्यावरुन हिणावल्यानंतर भडकल्या, म्हणाल्या, "अशी हुशारी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.