छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई. ‘उतरन’ या टीव्ही मालिकेत तपस्याची भूमिका करून अभिनेत्री रश्मी देसाई लोकप्रिय झाली. रश्मीचे खरे नाव शिवानी देसाई आहे. तिने अभिनय क्षेत्रात आल्यावर नाव बदलले. रश्मी देसाई ही गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मनोरंजन क्षेत्राचा भाग आहे. तिने आजवर आसामीपासून भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांत काम केले आहे. पण रश्मी देसाईंनी तिच्या व्यावसायिक जीवनात जितकी प्रगती पाहिली त्यापेक्षा जास्त दु:खाला तिच्या वैयक्तिक आयुष्यात सामोरं जावं लागलं. रश्मी देसाईने अभिनेता नंदिश संधूशी लग्न केले, पण पाच वर्षांतच हे लग्न तुटले.
यानंतर रश्मी देसाई निराधार झाली, तिच्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले आणि तिला रस्त्यावरील कारमध्ये राहावे लागले. पारस छाब्रा यांच्या पॉडकास्टमध्ये रश्मी देसाईने तिच्या आयुष्यातील या वेदनादायी टप्प्याबद्दल सांगितले. रश्मी देसाई हे ‘उत्तरन’द्वारे घराघरात नावारूपाला आले आणि या शोच्या सेटवर तिची नंदिश संधूशी भेट झाली. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर २०११ मध्ये त्यांनी लग्न केले. पण पाच वर्षांनी त्यांचे हे नाते तुटले.
आणखी वाचा – पॅडीकडून वर्षा उसगांवकरांची मस्करी, ब्रश करायलाही घरात पाणी नसल्याने हैराण, म्हणाल्या, “तुला नॉमिनेट करेन”
याबद्दल रश्मी देसाईने सांगितले की, “नंदिश संधूबरोबर लग्न झाल्यानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदलले. तिची आणि नंदिशमध्ये बाचाबाची सुरू झाली. एकीकडे संबंध बिघडत होते, तर दुसरीकडे तिच्यावर करोडो रुपयांचे कर्ज होते. रश्मीवर तब्बल ३.२५ कोटी रुपयांचे कर्ज होते. तिने एक घर घेतले होते. त्यावर अडीच कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र तिने हे सर्वकाही गमावले होते.
आणखी वाचा – पुन्हा परदेशात गेली पूजा सावंत, नवऱ्याबरोबर एन्जॉय करत आहे प्रत्येक क्षण, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
यापुढे रश्मी देसाईने सांगितले की, “ती ज्या शोमध्ये काम करत होती तो शो अचानक बंद झाला आणि ती रस्त्यावर आली. रिक्षावाले २० रुपयांत जे अन्न खायचे तेच ती खायची. तिचा घटस्फोट झाला आणि तिच्या कुटुंबीयांनीही तिचा निर्णय चुकीचा मानला. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, तिला रस्त्यावरील गाडीत दिवस काढावे लागले. यामुळे ती तणाव व नैराश्यात गेली. त्यामुळे तिला सोरायसिस नावाचाही आजार झाला. यामुळे तिचे वजन खूप वाढले आणि केसही गळू लागले. वाढलेल्या वजनामुळे जगण्यापेक्षा मरण बरे असे तिला वाटू लागले.