बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

श्रावण महिन्याची प्रेक्षकांना खास भेट, ‘जय भोले’ गाणं सर्वत्र प्रदर्शित, तुम्ही पाहिलंत का?

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 29, 2024 | 12:18 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Sawan 2024 special devotional song 'Jai Bhole' song released on itsmajja youtube channel.

श्रावण महिन्याची प्रेक्षकांना खास भेट, 'जय भोले' गाणं सर्वत्र प्रदर्शित, तुम्ही पाहिलंत का?

हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारचे सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या सणांना विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक मराठी महिन्यात विविध प्रकारचे सण उत्सव येतात. या मराठी महिन्यांमध्ये महत्त्वपूर्ण असणारा महिना म्हणजे श्रावण महिना होय. हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. कारण या महिन्यात शंकर भगवान यांची पूजा केली जाते. शिवपुराणानुसार श्रावण महिन्यात भगवान शंकरांची यथायोग्य पूजा केल्याने मनुष्याला दु:खपासून मुक्ती मिळते अन् सुखाची प्राप्ती होते. यंदाचा श्रावण महिना येत्या ५ ऑगस्टपासून सुरु होत आहे.

याच श्रावण महिन्यात महादेवांची अनेक भक्तीगीते ऐकली जातात आणि भक्तगण या गाण्यांवर तल्लीन होत महादेवांची पूजा व उपसना करतात. मराठीसह हिंदी व अनेक भाषांमध्ये आजवर महादेव यांच्यावर आधारित गाणी प्रदर्शित झाली आहेत. ही गाणी भक्तगणांच्या पसंतीसही पडली आहेत. अशातच आता ‘इट्स मज्जा’ही शंकर भगवान यांना समर्पित असं एक खास भक्तीगीत घेऊन आलं आहे. श्रावण महिन्यात शंकर भगवान यांची उपसना करताना भक्तांना भक्तिमय वाटण्यासाठी ‘इट्स मज्जा’ने सर्व महादेव भक्तांसाठी खास गीत आणलं घेऊन आलं आहे.

आणखी वाचा – “हे रसायन वेगळंच आहे”, ‘बिग बॉस’च्या घरातील सुरज चव्हाणच्या एण्ट्रीवर उत्कर्ष शिंदेची पोस्ट, म्हणाला, “छान किंवा वाईट…”

‘जय भोले’ असं या भक्तीगीताचे शीर्षक असून हे भक्तीगीत बुद्धा यांनी गायलं आहे. तर या गाण्याचे शब्दांकन रवी बस्नेत यांनी केलं आहे. तसेच या सुमधुर भक्तीगीताला सुरेल चाल देण्याचे काम राजीब व मोना यांनी केलं आहे. त्याचबरोबर ‘जय भोले’ या भक्तीगीताच्या निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी पार पडली आहे. या गाण्याचे प्रोजेक्ट हेड हे अनंत श्रीवास्तवा हे आहेत. तर क्रिएटिव्ह हेड अंकिता लोखंडे या आहेत.

आणखी वाचा – ‘सातव्या मुलीची…’ मालिकेला वेगळंच वळण, नेत्राच्या बाळाला इंद्राणीपासूनच धोका? इंद्राणी बाळाला मारण्याचे प्रयत्न करणार का?

दरम्यान, श्रावण स्पेशल ‘जय भोले’ हे महादेवांचे खास भक्ती सर्वांना ‘इट्स मज्जा’च्या युट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे. त्याचबरोबर JioSaavn, Wynk Music, Apple Music, Amazon Music, Gaana व Spotify आदी ऑडिओ प्लॅटफॉर्मवरसुद्धा तुम्हाला हे गाणं ऐकता येणार आहे. नुकतंच हे गाणं प्रदर्शित झालं असून अल्पावधीतच या गाण्याल महादेव भक्तांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हे खास भक्तीगीत ऐकून महादेवांच्या भक्तीत तल्लीन होऊ शकता.                

Tags: Jai BholeJai Bhole Song Marathi Newsmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
Abhijeet Kelkar On Kokanhearted Girl

"तिच जिंकणार", अंकिता वालावलकरला ट्रोल करत असताना सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा पाठिंबा, म्हणाला, "आमची कोकणकन्या…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.