‘कलर्स मराठी’ वाहिनीवर बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला ‘बिग बॉस’मराठी नवं पर्व हा कार्यक्रम सुरु झाला आहे. अखेर काल या शोचा ग्रँड प्रीमियर सोहळा अगदी दिमाखात संपन्न झाला आणि या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला. सर्वत्र या नव्या कार्यक्रमाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वात एकापेक्षा एक स्पर्धक पाहायला मिळत आहेत. केवळ कलाकार मंडळीचं नव्हे तर कीर्तनकार, गायक, रील स्टार, मॉडेल, रॅपर यांनाही यंदाच्या पर्वाने नवा प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे. (Abhijeet Kelkar On Kokanhearted Girl)
या नव्या पर्वात एका स्पर्धकाची अधिक चर्चा सुरु आहे ती म्हणजे कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिची. अंकिता प्रभू वालावलकर ही सोशल मीडियावर स्टार आहे. ती सोशल मीडियावर विशेष सक्रिय असून ती विविध कार्यक्रमांमध्ये दिसली आहे. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये पाहुणी म्हणून तर पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेट अँकर म्हणून तिने जबाबदारी पार पाडली. त्यामुळेच रील स्टार म्हणून अंकिताचा सुरु झालेला हा प्रवास साऱ्यांनी पाहिला आहे.
आणखी वाचा – पहिल्याच दिवशी ‘बिग बॉस’च्या घरातील पाणी गायब, सदस्यांची तारांबळ, आणखी नवा ट्विस्ट आणणार
‘बिग बॉस’मराठीच्या या नव्या पर्वात रील स्टार यांना खूप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. त्यांच्यासाठी या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून येणं ही खूप मोठी संधी आहे. या नव्या पर्वात अंकिता आता कशी खेळणार याकडे साऱ्यांच्या नजरा आहेत. कोकणकन्या अंकिताचा खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे. याशिवाय काही कलाकारही अंकिताला सपोर्ट करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’मध्ये अंकिताला पाहून एका मराठमोळ्या अभिनेत्याने तिला पाठिंबा दर्शविला आहे. कोकण हार्टेड गर्लची एण्ट्री होताच सोशल मीडियावर काहींनी तिला पाठिंबा दर्शिविला तर काहींनी तिला ट्रोलही केलं आहे, अशातच अभिजीतने तिला पाठिंबा दिला असल्याचं समोर आलं आहे.
हा अभिनेता म्हणजे ‘बिग बॉस’फेम अभिजीत केळकर. अभिजीत हा कोकणातला असून त्याने कोकण हार्टेड गर्लला ‘बिग बॉस’च्या घरात पाहून सपोर्ट केला आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवर खास पोस्ट शेअर करत “‘बिग बॉस मराठी माझी सर्वात जास्त आवडीची स्पर्धक आमची कोकणकन्या अंकिता वालावलकर. माझा तिला पूर्ण पाठिंबा आहे. तिच जिंकणार”, असं म्हणत त्याने ट्रॉफी घेऊन येण्यासही सांगितलं आहे.