बॉलिवूडमध्ये सध्या लग्न, वेगळे होणं, दूर जाणं या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा व अर्जुन कपूर हे दोघही एकमेकांपासून वेगळे झाल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या. मात्र अद्याप यावर दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र समोर आलेल्या व्हिडीओनुसार, दोघांचा खरच ब्रेकअप झाल्याचे दिसून आले आहे. दोघेही गेल्या आठ वर्षांपासून एकत्र होते मात्र या काळात त्यांचे दोनदा ब्रेकअप झाले. अशातच ते आता एकत्र नसल्याची बातमी समोर आली आहे. (malaika arora and arjun kapoor video)
मिळालेल्या माहितीनुसार, मलायका व अर्जुन दोघंही एका फॅशन इव्हेंटसाठी पोहोचले होते. यावेळी त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओमध्ये दोघंही एकमेकांना टाळत असल्याचे दिसून येत आहे. तसेच ते एकमेकांबरोबर न बसता वेगवेगळे बसलेलेही ते दिसून येत आहेत. त्यांच्यामध्ये दुरावा ठेऊन बसल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ समोर आल्यानंतर खरच त्यांच्या नात्याचा शेवट झाला असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
तसेच व्हायरल झालेल्या काही व्हिडीओमध्ये अर्जुन कपूर चाहत्यांबरोबर सेल्फी घेताना दिसत आहे. यावेळी मलाइका त्यांच्या जवळून जात असताना अर्जुन तिला गर्दीपासून वाचवण्यासाठी तिला तिथून बाहेर पडण्यासाठी मदत करत आहे. पण मलायकाने याकडे दुर्लक्ष करत आहे. अर्जुनकडे लक्ष न देताच पुढे निघून जाते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर दोघांच्याही चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दोघांमध्ये दुरावा असल्याचे व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्टपणे दिसून येत आहे. यामुळे आता नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
यावर एका नेटकाऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, “दोघांमधील नातं संपलं आहे”, तसेच अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “याचा अर्थ दोघांचा ब्रेकअप झाला आहे”, तसेच अजून एकाने लिहिले की, “ती आधीच तिच्या आयुष्यात खूप काही सहन करत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रायव्हसीची काळजी घेणं आपल्या हातात आहे”. २०१८ साली दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली होती. एकमेकांबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसले होते.