सध्या सोशल मीडिया वर चांगलीच चलती आहे ती वेगवेगळ्या ट्रेडिंग गाण्यावरच्या रील ची. मग अगदी लहानमूल ते वयोवृध्द गटा पर्यंत हा मोह कुणाचाही सुटला नाही. अनेक कलाकारांना ही आजकाल रील साठी सुध्दा जास्त ओळखले जाते. वेगवेगळ्या reels ने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी एक अभिनेत्री म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम नम्रता संभेरावं.(Namrata sambherao share reel)
नम्रताचा नुकताच कुरर्र नाटकाचा अमेरिका दौरा पार पडला. त्या संबधित अनेक पोस्ट, रील सुध्दा तिने प्रेक्षकांसमोर शेअर केले. असच एक नवीन रील नम्रता ने शेअर केलय पण या रील मध्ये नम्रता सोबत एक लहान कलाकार दिसत आहे आणि तो आहे ज्युनिअर खांडेकर म्हणजेच हास्य जत्रा कलाकार प्रसाद खांडेकर चा मुलगा श्लोक खांडेकर.

ट्रेंडिंग गाण्यावर श्लोक आणि नम्रताने केलेला डान्स प्रेक्षकांनासोबतच कलाकारांना देखील भुरळ पाडतोय. नम्रता ने रील तीच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करत ‘ श्लोक प्रसाद खांडेकर ‘ my little partner असं कॅपशन देखील दिलं आहे. (Namrata sambherao share reel)
महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक स्किट्स निखळ विनोदाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा काम करत आहे. प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, समीर चौघुले, वनिता खरात, रोहित माने, निखिल बने, दत्तू मोरे, प्रभाकर मोरे, अरुण कदम आणि अशाच अन्य तुफान विनोदी टायमिंग असणाऱ्या कलाकारांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.