आज काल सगळेच सेलिब्रटी स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. रोज कॅमेराला फेस करण्यासाठी सेलिब्रिटीजला फिट राहणं गरजेचं वाटत असतं. त्यामुळे ज्याला जसा वेळ मिळेल, तसे प्रत्येकजण स्वतःला फिट ठेवण्यासाठी, जिम, योगा आणि डाईट याचा समावेश आपल्या आयुष्यात करत असतात. या बद्दलची माहिती तसेच व्हिडीओज फोटोज ते चाहत्यांसाठी शेअर करतच असतात. नुकताच अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने वर्कआऊटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Jahnavi Killekar Exercise Video)

या व्हिडिओमध्ये जान्हवीचा जिम ट्रेनर जान्हवीकडून एक्सरसाईज करून घेत आहे. जान्हवीने ह्या व्हिडिओला “Believe in yourself and you will be unstoppable.” असे प्रेरित करणारे कॅप्शन दिले आहे.
हे देखील वाचा: साडी आणि तु दोन्हीं कमाल’ जुईचा घायाळ करणारा अंदाज
जाह्नवीच्या या व्हिडिओवर एका चाहत्याने जान्हवीला “Bidrow machine ची एक्सरसाईज करत आहात, ती चुकीची करत आहात. शोल्डर एका जागेवर ठेवा. आणि बॉडी मुमेंट नका करू” असा सल्ला दिला आहे. या कमेंटवर जान्हवीने थम पाठवत रिप्लाय केला आहे. तर एकाने “गावाकडे पंपावर पाणी भरायला गेली तरी व्यायाम होईल” अशी मिश्किल अंदाजात कमेंट केली आहे. (Jahnavi Killekar Exercise Video)
हे देखील वाचा: पुन्हा एकदा एकत्र आले ‘बबड्या आणि आई’
जान्हवीने सध्या “भाग्य दिले तू मला” या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत जानव्ही नेगिटिव्ह भूमिका साकारताना दिसत आहे. या कार्यक्रमात जान्हवी सतत कटकारस्थान करताना दिसते. त्यामुळे जान्हवीचे हे नेगिटिव्ह पात्र सध्या खूप चर्चेमध्ये आहे.