अनंत अंबानी व राधिका मर्चंटचे लग्न मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडले. या शाही जोडप्याच्या लग्नाला प्रसिद्ध व्यक्ती आणि ज्यांच्याशी अंबानी कुटुंबाचे खास नाते आहे असे सर्व पाहुणे उपस्थित होते. या लग्नात शाहरुख खान, महेंद्रसिंग धोनी, सलमान खानसह अनेक व्हीआयपी पाहुणे उपस्थित होते. याबरोबर ज्या व्यक्तीने अनंतला लहानपणी सांभाळून घेतले त्याही या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. अनंत अंबानींच्या लग्नात नॅनी ललिता डिसिल्वा यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. (Ambani and Taimur Nanny Salary)
ललिताने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते, जे पाहून लोकांनी ओळखले की, सेलिब्रिटींच्या जगात तिचा चेहरा नवीन नाही. शेअर केलेल्या फोटोंमध्ये ललिता डिसिल्वा अनंत अंबानींना मिठी मारताना दिसत आहे. तिने आणखी काही फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती अंबानी कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर दिसली. ललिताने हे फोटो शेअर केल्यानंतर या नॅनी बऱ्याच चर्चेत आलेल्या पाहायला मिळत आहेत.
ललिता डिसिल्वाने अनंतबरोबरचे फोटो शेअर करताच चाहत्यांना हे ओळखायला वेळ लागला नाही की ती करीना कपूर व सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खानची नॅनी होती. अनंतला त्याच्या आयुष्यातील नवीन इनिंगसाठी शुभेच्छा देण्याबरोबरच ललिताने त्याच्यासाठी आणि अंबानी कुटुंबासाठी एक गोड चिठ्ठीही लिहिली. ललिता डीसिल्वा या अनंत अंबानीच्या नॅनी होत्या. दरमहिन्याला त्यांना खूप चांगलं मानधन मिळत होते.
रिपोर्ट्सनुसार, ललिता डिसिल्वा ही करीना कपूरचा लेक तैमूरची नॅनी होती. त्यांना दरमहा दीड लाख रुपये यासाठी मानधन मिळते. करीन कपूरने तिच्या मुलाच्या जन्मानंतर ललिताला नॅनी म्हणून कामावर ठेवले आणि त्यावेळी करीना-सैफने तिला दरमहा दीड लाख रुपये पगार देण्याचे ठरविले. ललिता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा मुलगा जैनची नॅनी होती. रिपोर्ट्सनुसार, त्यांना सरासरी ८० हजार रुपये पगार मिळतो. ललिता या सध्याच्या काळातील दक्षिण भारतीय सुपरस्टार राम चरण यांची लेक क्लिन कारा कोनिडेलाची नॅनी आहे. यासाठी त्यांना मोठी रक्कम मिळते.