टेलिव्हिजनवरील सर्वात वादग्रस्त रिॲलिटी शो असण्याबरोबरच ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हा रिॲलिटी शो इतका लोकप्रिय झाला आहे की, ‘बिग बॉस ओटीटी’च्या रुपात त्याचे डिजिटल व्हर्जनदेखील खूप हिट होत आहेत. ‘बिग बॉस OTT ‘ चा तिसरा सीझन २१ जून रोजी प्रीमियर झाला आणि हा शो अनिल कपूर होस्ट करत आहे. सध्या हा शो खूप लोकप्रिय होत असून चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस ओटीटी ३’चा ग्रँड फिनाले ४ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे सांगितले जात आहे परंतु अद्याप याबद्दल अधिकृतपणे काहीही जाहीर करण्यात आलेले नाही. (Bigg Boss 18)
‘बिग बॉस ओटीटी’चा हा सीझन संपण्यापूर्वीच लोक ‘बिग बॉस १८’साठी उत्सुक दिसत आहेत. टीव्हीवर ‘बिग बॉस १८’ कधी सुरु होत आहे त्याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. आता ‘बिग बॉस १८’च्या संदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत. याबरोबर हा शो टीव्हीवर कधी प्रसारित होणार हे जाणून घेण्यासाठी चाहतेही अधीर झाले आहेत. अशा परिस्थितीत, ‘खबरी ऑन एक्स’च्या रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, हा शो ‘कलर्स टीव्ही’वर सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला सुरु होऊ शकतो.
आणखी वाचा – गुरुपौर्णिमानिमित्त प्रेक्षकांसाठी खास भेट, ‘श्री स्वामी समर्थ’ गाणं सर्वत्र प्रदर्शित
#BreakingNews#BiggBoss18 to kick start on @ColorsTV from end of September or October Starting.
— Khabri 👂 (@real_khabri_1) July 18, 2024
Many famous celebrities have been approached.
खबरीने X वर लिहिले, “ब्रेकिंग न्यूज बिग बॉस १८ सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या शेवटी कलर्स टीव्हीवर सुरु होईल. अनेक सेलिब्रेटींशी संपर्क साधण्यात आला आहे, मात्र याबाबत अधिकृतपणे काहीही जाहीर करण्यात आलेले नाही”. ‘बिग बॉस १८’च्या प्रीमियरच्या तारखेची चर्चा होत असताना आता सलमान खान ‘बिग बॉस १८’ होस्ट करणार की नाही हे पाहणे बाकी आहे. अभिनेत्याने त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमुळे ‘बिग बॉस ओटीटी ३’ होस्ट केला नाही.
‘बिग बॉस OTT ३’ बद्दल बोलायचे झाले तर या शोमधून अनेक स्पर्धकांना बाहेर काढण्यात आले आहे. सध्या शिवानी कुमारी, अरमान मलिक, कृतिका मलिक, रणवीर शौर, सई केतन राव, सना सुलतान, सना मकबूल, विशाल ठाकूर, लवकेश कटारिया, दीपक चौरसिया, नेजी व वाईल्ड कार्ड प्रवेश करणारा अदनान शेख बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालत आहेत.