प्रसिद्धी मिळावी, चर्चेत राहावं म्हणून सोशल मीडिया वर असायलाच हवं हे गरजेचं नसत. कुठेही सोशल मीडिया वर नसून देखील आपली कला आणि सादरीकरणाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर करणं खूप कमी कलाकारांना जमत आणि हे शक्य करून दाखवलाय कोकण कोहिनूर म्हणून ओळख असणाऱ्या अभिनेता ओंकार भोजनेने. महाराष्ट्री हास्य जत्रा असो, मराठी चित्रपट असो किंवा आता रंगभूमीवर धुमाकूळ घालणार नाटक करून गेलो गाव असो ओंकार ने वेळोवेळी त्याच्या कलेचं उत्कृष्ट सादररीकरण करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.(Onkar Bhojne love)
परफेक्ट,अफलातून अभिनयाने ओंकारने समस्त प्रेक्षक वर्गाला वेड लावले. सर्वांना हसविण्यात तरबेज असलेला आणि ‘कोकण कोहिनूर’ म्हणून साऱ्या रसिक प्रेक्षक वर्गाचा लाडका अभिनेता ओंकार आता मालिकाविश्वातून बाहेर येत पुन्हा सिनेविश्व आणि नाटकविश्वाकडे वळला आहे. एकांकिका क्षेत्रापासून ओंकारने अभिनयाची सुरुवात केली. मध्यंतरी त्याने छोट्या पडद्यावर आपला वावर वाढवला होता. याशिवाय ओंकारने नाटकविश्वातही चांगला ठसा उमटविला. सिनेसृष्टीत पाऊल टाकत ओंकार एकामागोमाग एक चित्रपट करण्यात व्यस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे.

पण सध्या ओंकार चर्चेत आहे ते त्याच्या लग्नाच्या विषयावरून. एका मुलाखती दरम्यान ओंकारने सांगितले कि त्याच्या लग्नाची जबाबदारी त्याच्या घरच्यांकडे असून मला आता पर्यंत कधी प्रेम झालेलं नाही असं सांगितलं. तर तुझी कोणी क्रश आहे का असं विचारलं असता त्याने कोकण हार्टेड गर्ल अंकिता हीच नाव घेत अंकिताचे रील्स मला आवडतात असं त्याने सांगितलं. तर आता कोंकण कोहिनूर ओंकार साठी घरचे किंवा मित्र परिवार लग्नासाठी कोणतं रत्न शोधणार हे पाहून चाहत्यांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.(Onkar Bhojne love)